तुष्टीकरण संपवून तृप्तीकरणाचा भाजपचा मार्ग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

    04-Jul-2022
Total Views | 37

narendra modi
 
हैदराबाद : हैदराबादचा उल्लेख भाग्यनगर करत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला रविवारी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “ सरदार पटेल यांनी ’एक भारत श्रेष्ठ भारत’चा नारा दिला होता. आमच्या पक्षाचाही हाच नारा आहे. आमचा एकच कार्यक्रम आहे - तुष्टीकरण संपवून तृप्तीचा मार्ग स्वीकारायचा.” रालोआच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीचे कौतुक करत हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे यावेळी बोलताना मोदी म्हणाले.
 
 
भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या द्वि-दिवसीय बैठकीच्या समारोपानिमित्त परेड ग्राऊंडवर आयोजित विराट जाहीर सभेला मोदी संबोधित करत होते. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि अमित शाह, तेलंगण भाजपचे प्रभारी तरुण चूघ, तेलंगण भाजपचे अध्यक्ष बंडी संजयकुमार, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्यासह अनेक नेते व्यासपीठावर उपस्थितहोते.
 
तेलंगणा विधानसभा निवडणुकीला जवळपास दीड वर्षांचा कालावधी असला, तरी मोदी यांनी आजच्या जाहीर सभेने तेलंगणमधील निवडणूक प्रचाराचा शंखनाद केल्याचे दिसून आले. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात तेलुगू भाषेतून करत उपस्थित जनसमुदायाचे मन जिंकले. ते म्हणाले की, “तेलंगणचा चौफेर विकास ही भाजप सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या भूमिकेतून भाजप सरकारच्या सेवाभावाचा फायदा राज्यातील दलित, शोषित, पीडित आणि वंचित वर्गातील जनतेला मिळत आहे. यामुळेच देशातील सर्वसामान्य जनतेचा भाजपवर विश्वास आहे. तेलंगणमधील जनतेचाही भाजपवरील विश्वासही वाढत आहे. गेल्या आठ वर्षांत देशात आम्ही सकारात्मक परिवर्तन आणण्याचा प्रयत्न केला. विकासाचे फायदे समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला,” असे ते म्हणाले.
 
भाजपच्या तेलंगणमधील यशाविषयी बोलताना ते म्हणाले की, “जनतेचा पाठिंबा भाजपवरच्या तुमच्या प्रेमाचे निदर्शक आहे. हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत याचा अनुभव आला आहे. तेलंगणमधील जनताही राज्यात ‘डबल इंजिन’ सरकार आणण्यासाठी कामाला लागली आहे. सरकारच्या कल्याणकारी योजनांचा फायदा देशातील जनतेसोबत तेलंगणमधील जनतेलाही मिळत आहे,” असेही मोदी म्हणाले.
 
हैदराबादमध्ये ‘नॅशनल सायन्स सेंटर’ स्थापन करायला सरकार प्रयत्नशील आहे, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, “नव्या शैक्षणिक धोरणातून आम्ही स्थानिक भाषांतून शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तेलुगू तुष्टीकरण संपवून तृप्तीकरणाचा भाजपचा मार्ग भाषेतून उद्या वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे शिक्षण मिळाले, तर तेलंगणमधील अनेक मातांच्या स्वप्नांची पूर्तता झाल्याशिवाय राहणार नाही. तेलंगणमधील शेतकर्‍यांच्या विकासासाठी मोठा खत प्रकल्प सुरू केला जाईल,” अशी घोषणा करताना मोदी म्हणाले की, “धान उत्पादक शेतकर्‍यांकडून एक लाख कोटी रुपयांची धान खरेदी करण्यात आली, धानाच्या हमी भावात ८० रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली. १५०० कोटी खर्च करून हैदराबाद शहरात चौपदरी आणि सहा पदरी रस्ते तयार केले जाणार आहेत. राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीत लक्षणीय वाढ झाली आहे, शहरेच नाही तर गावेही राष्ट्रीय महामार्गाला जोडली जाणार आहेत,” असेही मोदी यांनी सांगितले.
 
 
संघर्षयात्रा नाही तर देशभर स्नेहयात्रा काढा
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “आता आम्ही सत्तेत आहोत, त्यामुळे संघर्ष करण्याची गरज नाही. लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवल्यामुळे आम्ही देशभर संघर्षयात्रा नाही तर, स्नेहयात्रा काढल्या पाहिजे,” असे आवाहन करताना मोदी म्हणाले की, “संवाद, संयम, संतुलन, सेवाभाव, समन्वय, संवेदना आणि सकारात्मकता या सात शब्दांसह सामाजिक जीवनातील वाटचाल सुरू केली पाहिजे. केवळ ‘प्रो-पीपल’, ‘प्रो-अ‍ॅक्टिव्ह’ म्हणजे ‘गुड गव्हर्नन्स’ याचा विसर पडू देता कामा नये.”
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121