मुंबई : ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (Olectra) या भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीने दि. 30 जून रोजी संपलेल्या तिमाहीत रु. 304.7 कोटींचा महसूल नोंदवला आहे, जो मागच्या वर्षीच्या तिमाहीत रु. 41.2 कोटी होता. महसुलात 640 टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे. या तिमाहीत 169 इलेक्ट्रिक बसेसच्या मागणीची पुर्तता करण्यात आली.
मागच्या वर्षीच्या तिमाहीत फक्त 11 बसेसची डिलेव्हरी होउ शकली होती. चालू तिमाहीत कंपनीच्या पुणे बस संचालनातून उत्तम उत्पन्नाची नोंद झाली आहे. करारानंतरचा नफा 825.2 टक्क्यांनी Y-o-Y आधारावर वाढून 18.8 कोटी झाला आहे जो मागील वर्षीच्या याच कालावधीत फक्त रु.2.0 कोटी होता. EBITDA 8.7 कोटींच्या तुलनेत 322.6 टक्क्यांनी वाढून 36.8 कोटी झाला आहे. करपूर्व नफा (PBT) 799.9 टक्क्यांनी वाढून रु. 24.7 कोटी इतका झाला आहे. कंपनीने 18.8 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे.