नवी दिल्ली : भारतीय ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा ध्वजवाहक होण्याचा मान सिंधूला मिळणार आहे. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघारी घेतल्यानंतर हा मान साधूला मिळणार आहे.
नीरजच्या माघारीनंतर हा मान नेमका कोणाला द्यावा याबद्द्दल आम्ही विचारात होतो असे स्पष्टीकरण आयओएने दिले आहे. सिंधू खेरीज आमच्या विचारात मीराबाई चानूचेही नाव विचारात होते पण आम्ही सिंधूच्या नावावर शिक्कामोर्तब केले असे आयओएने जाहीर केले आहे. आयओएचे कार्यकारी अध्यक्ष अनिल खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील चार जणांच्या समितीने हा निर्णय घेतला आहे.