विमानतळावर बाजीप्रभूंना पाहिले अन्...

    26-Jul-2022
Total Views | 75
 
ajaypurkar
 
 
 
पुणे : सध्या चित्रपटसृष्टीत एकापाठून एक ऐतिहासिक चित्रपट येत आहेत. त्यात सर्वात गाजला तो म्हणजे 'पावनखिंड'. दिग्पाललांजेकर लिखित, दिग्दर्शित 'पावनखिंड'ने बॉक्स ऑफिसवर देखील सर्वात जास्त कमाई केली होती. या चित्रपटामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली होती अभिनेते अजय पुरकर यांनी. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला होता. फक्त अजय पुरकर यांचीच नाही तर इतर सर्व व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकारांचे काम प्रेक्षकांना खूप आवडले होते. चित्रपट प्रदर्शित होऊन काही महिने झाले असले तरी प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची क्रेझ आजही दिसून येते.
 
 
 
 
बाजीप्रभूंची भूमिका साकारणाऱ्या अजय पुरकर यांच्याबरोबर नुकतीच एक घटना घडली. ही घटना त्यांनी स्वतः आपल्या सोशल मिडियावरून सांगितली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर सध्या व्हायरल होत आहे. यात झाले असे की, या चित्रपटातील कलाकार अजय पुरकर, मृणाल कुलकर्णी आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे एका सिनेमाच्या शूटिंगनिमित्ताने दुसऱ्या गावी जात होते. त्यासाठी त्यांची टीम पुणे विमानतळावर पोहोचली. तेव्हा तेथील टीव्हीवर त्यांचाच 'पावनखिंड' हा चित्रपट सुरु होता. दरम्यान बाजीप्रभू देशपांडेची भूमिका साकारणाऱ्या अजय पुरकर यांना प्रत्यक्ष समोर पाहून विमानतळावरील मंडळी थक्क झाली. रील बाजीप्रभू देशपांडेंना समोर प्रत्यक्ष पाहून त्यांचे चाहते भारावून गेले .
 
 
निर्माते प्रद्योत पेंढारकर यांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत म्हटले आहे, 'योगायोग... 'पावनखिंड चित्रपट टीव्हीवर चालू असतानाच आम्ही पुणे विमानतळावर पोहोचलो आणि प्रत्यक्ष बाजीप्रभुंना समोर पाहिल्यावर एअरपोर्टवर जी धांदल उडाली ती मजाच काही और!' यावेळी व्हिडिओमध्ये मागे स्क्रीनवर चित्रपटातील बाजीप्रभूंचा महत्वाचा सिन चालू आहे आणि पुढे अभिनेते अजय पुरकर उभे आहेत.
 
 
 
अजय पुरकर आणि टीमला एअरपोर्टवर अचानक पाहून कर्मचाऱ्यांना एवढा आनंद झाला की त्यांनी या कलाकारांची खातिरदारी केली. या चित्रपटात अजय पुरकर यांच्यासोबतच चिन्मय मांडलेकर, अंकित मोहन, मृणाल कुलकर्णी मुख्य भूमिका आहेत. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर निर्मिती करत असलेल्या 'शिवराज अष्टक' या मालिकेतील 'पावनखिंड' हा तिसरा सिनेमा होता. त्या नंतर आलेला 'शेर शिवराज' या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली होती.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
जरुर वाचा
पंजाबच्या मोहालीत हिमाचल रोडवरील अवजड वाहतूक बसवर हल्ला, ओळख लपवण्यासाठी हल्लेखोरांनी वाहनाच्या नंबरप्लेटवर लावली टेप

पंजाबच्या मोहालीत हिमाचल रोडवरील अवजड वाहतूक बसवर हल्ला, ओळख लपवण्यासाठी हल्लेखोरांनी वाहनाच्या नंबरप्लेटवर लावली टेप

Bus Attack पंजाबमधील मोहालीच्या खरार हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या एका बसवर हल्ला (Bus Attack) करण्यात आला.ही हल्ला मंगळवारी ६.३० च्या सुमारास झाला असल्याची घटना घडली आहे. हिमाचल प्रदेशातील हमीरपूर डेपोच्या बसवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करत बसची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. संबंधित बस चंदीगडहून हिमाचलमधील हमीपूरला जात होती. रोडवेज बस चंदीगडच्या सेक्टर ४३ येथील आयएसबीटीतून निघाली होती. बसने नुकतेच १० किमी अंतर कापले होते. खरारजवळ अज्ञात ..