मुंबई : ठाकरे सरकरमधील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत असताना आता आदित्य ठाकरेंचीही पोलखोल होणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अडीच वर्षांच्या कालावधीतील सर्व कामांचे केंद्र सरकरकडून ऑडिट केले जाणार आहे. त्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामांचाही समावेश आहे. महाविकास आघाडीचे अनेक घोटाळे बाहेर येत असताना आता आदित्य ठाकरेंवरही आता चौकशीचा ससेमिरा लागणार आहे.
आता पर्यंत मुंबई, पुणे, कोल्हापूर, ठाणे, रायगड या सर्व विभागांतील कार्यालयांचे ऑडिट सुरु झाले असल्याने येथील अधिकारी कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. या सर्व कामांचे ऑडिट जरूर व्हावे पण यातून उगाच महामंडळाच्या कामांची बदनामी होऊ नये अशी अपेक्षा महामंडळ कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाने घाबरुन जाऊन त्यांच्यावर फक्त आकसापोटीच कारवाई होत आहे, असा कांगावा शिवसेनेकडून केला जात आहे.