जागतिक बुद्धिबळ दिवस आणि बुद्धिबळाचा इतिहास

    20-Jul-2022
Total Views | 242

chess
 
 
२० जुलै हा दिवस सर्वत्र जागतिक बुद्धीबळ दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. विश्वनाथन आनंद या भारताच्या बुद्धिबळ खेळाडूने भारताचे नाव संपूर्ण जगात उंचावले आहे. पाच वेळा जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विश्वनाथन आनंदने जिंकली आहे. तसेच रमेशबाबू प्रज्ञानंदा हा तरुण विश्वनाथन आनंदचा वारसा पुढे घेऊन जात असल्याचे दिसत आहे.जागतिक बुद्धिबळ दिवसाच्या निमित्ताने आपण आज जाणून घेऊया बुद्धिबळ आणि जागतिक बुद्धिबळ दिवसाचा इतिहास.
बुद्धीबळाचा इतिहास
जगातील अनेक देश बुद्धिबळाच्या शोधाचा दावा करतात. परंतु सध्यातरी या खेळाची सुरवात ही प्रथम भारतात झाली असल्याचेच मानले जाते. बुद्धीबळाची निर्मिती ही चतुरंग या खेळातून झाली असून पुरातन काळात हा खेळ चार खेळाडूंमध्ये रंगायचा. चतुरंग म्हणजे "सैन्याची चार अंगे". म्हणजेच पायदळ, घोडदळ, हत्ती आणि रथ. त्याचबरोबर प्राचीन काळात केवळ भारतीय सैन्यांमध्येच घोडे, उंट आणि हत्ती हे तीनही प्राणी वापरले जात होते.
 
 
साहित्यामध्येहि बुद्धिबळाचा संदर्भ आढळतो. बुद्धिबळाचा पहिला संदर्भ इ.स. पूर्व ५०० मध्ये भारतात दिघ निकय मध्ये ब्रह्मजल सुत्त या ग्रंथात आढळतो. दरम्यान पर्शियामधील बुद्धिबळाचा पहिला संदर्भ हा इ.स. ६०० च्या दरम्यान आढळतो. येथे बुद्धिबळाला शतरंज असे म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे इ.स. ८०० पर्यंत हा खेळ चीनमध्ये शिआंकी या नावाने पोहचला होता.
 
चतुरंग म्हणजेच बुद्धिबळ या खेळाचा विस्तार हा पुरातन काळातील सिल्क रोडद्वारे पर्शिया, अरब जगतात झाला. तसेच तो तेथून जगभर पसरला. हा खेळ भारतातील गुप्त राजवटीवेळी खेळला जात होता. हा खेळ इ.स. चौथ्या शतकापासून इ.स. सहाव्या शतकापर्यंत खेळण्यात येत असल्याचे देखील म्हटले जाते. सध्या बुद्धीबळाचे अगिणत प्रकार अस्तित्वात आहेत. बुद्धीबळ खेळ बैद्धिक क्षमता वाढण्यास मदत करते. त्याचप्रमाणे बुद्धिबळ हा सर्वसमावेशकता, सहिष्णुता, एकमेकांप्रती आदर आणि न्याय भावना वाढीस लावते. संयुक्त राष्ट्राने त्यांच्या वेबसाईट म्हटल्यानुसार बुद्धीबळ हा संयुक्त राष्ट्राच्या २०३० पर्यंतच्या शाश्वत विकास उद्येशांमधील एक महत्वाचा भाग आहे.
 
जागतिक बुद्धीबळ दिवसाचा इतिहास
 
१२ डिसेंबर २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण बैठकीत जागतिक बुद्धीबळ दिवसाला मान्यता देण्यात आली. त्यावेळी जुलै महिन्याची २० तारीख हा दिवस साजरा करण्यासाठी निवडण्यात आली. कारण याच दिवशी १९२४ रोजी आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ फेडरेशनची स्थापना पॅरिसमध्ये करण्यात आली होती. या जागतिक फेडरशेन अंतर्गत तब्बल १५० पेक्षाही अधिक बुद्धीबळ फेडरेशन सलग्नित आहेत. हे सर्व सदस्य १९६६ पासून जागतिक बुद्धीबळ दिवस साजरा करत होते.
अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121