नालेसफाईची पोलखोल : योगेश सागर यांनी मागितला १८६ कोटींचा हिशोब

दक्षता विभागामार्फत चौकशीची मागणी! अन्यथा भाजपतर्फे जनआंदोलन निश्चित

    20-Jul-2022
Total Views | 71
news 1  1





मुंबई : नालेसफाईची पोलखोल या विषयासंदर्भात भाजप आमदार योगेश सागर यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहून लक्ष वेधले आहे. मुंबईतील अपूर्ण नालेसफाई संदर्भातील कामे पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत संबंधित कंत्राटदारांना कुठल्याही प्रकारची देयक रक्कम वर्ग करु नये, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
 
योगेश सागर आपल्या पत्रात म्हणाले की, "मुंबईतील आठ दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे नालेसफाीची पोलखोल झालेली दिसून येत आहेत. मुंबईतील सर्वच नाल्यांमध्ये गाळ व कचरा साचला आहे. त्यातून पाण्याचा निचरा झालेला नाही. यावर्षी  तब्बल ८३.९ कोटी तसेच छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी सुमारे १०२.३५ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. तरीही विदारक स्थिती पाहता १० टक्के नालेसफाईसुद्धा झालेली नाही. कंत्राटदारांनी केवळ कागदावरच देयके सादर केलेली आहेत. प्रत्यक्षात मात्र नालेसफाई न झाल्याने मुंबईकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे."
 
"माझी आपल्याला विनंती आहे की, मुंबईतील अपूर्ण नालेसफाीची दक्षता विभागामार्पत चौकशी केली जावी. जोपर्यंत चौकशीचा अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत संबंधित कंत्राटदारांनीा कोणत्याही प्रकारच्या देयकाचे अधिदान करू नये. याबद्दल तातडीने सुधारात्मक कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा भाजपतर्फे जनआंदोलन छेडण्यात येणार आहे.", असा इशारा आमदार सागर यांनी पत्राद्वारे केला आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121