मुंबई: सुरत, गुवाहाटी आणि त्यानंतर गोवा असा प्रवास करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार तब्ब्ल ११ दिवसांनी मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. आमदारांच्या सुरक्षतेसाठी गोव्यातील ताज कॉन्व्हेंशन हॉटेलबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गोवा विमानतळावर आमदारांसाठी स्पेशल विमान तयार ठेवण्यात आली आहेत. स्पाईस जेटच्या चार्टर विमानतून सर्व आमदार मुंबईला जाणार आहेत. गोवा पोलीस, गोव्याची कमांडो युनिट यांच्या गराड्यात आमदारांच्या एकूण तीन बस आहे.
शिंदे मंत्रिमंडळाचे ३ जुलै पासून दोन दिवसीय अधिवेशन सुरु होणार असून, याच पार्श्वभूमीवर आमदारांना मुंबईत बोलवण्यात येत आहे. आमदारांच्या स्वागतासाठी मुंबईत जय्य्त तयारी करण्यात आलेली आहे. मुंबई विमानतळाच्या गेट नंबर ९ च्या मार्गावर ढोल ताशे मागविण्यात आले आहेत. भाजप आणि शिंदे गटाची २ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता संयुक्त बैठक पार पडेल. आतापर्यंतच्या रणनीतीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदारांना मार्गदर्शन करतील.