मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचे थैमान पुन्हा एकदा सुरु झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात झाली आहे. विदर्भात पुन्हा एकदा पावसाने जो धरण्यास सुरुवात केली असल्याने गडचिरोली तालुक्याला पुन्हा एकदा पुराने वेढण्यास सुरुवात केली आहे. आता पर्यंत जिल्ह्यातील १२० गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.
दक्षिण जिल्ह्यातील पर्लकोटा नदीला आलेल्या पुराने वाहतुकीचे मार्ग बंद पडले आहेत. सिरोंचा तालुक्यातही पुराचे थैमान सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्याप्रमाणे तातडीने बचाव पथक आणि आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आरोग्य सेवकांचे पथक भामरागड तालुक्यात तैनात करण्यात आले आहे.