Shocking !
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 15, 2022
High Court cancelled ₹3,675crore BEST E-Bus tender award to Evey Trans saying it was incorrect !
BUT
BEST GOING AHEAD with Tender Award to Evey Trans !
I wrote to Dep CM @Dev_fadnavis ji to stop this
₹3,675crore LOOT of Mumbaikars by BEST/Contractor Mafia ! pic.twitter.com/QOKR6ZtXFW
पत्रात अॅड. आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, “ ‘बेस्ट’ने नव्या २ हजार, १०० ‘ई-बस’ खरेदी करण्याचे कंत्राट ‘ईव्ही ट्रान्स प्रा. लि.’ या कंपनीला दिले असून ही कंत्राटाची निविदा प्रक्रिया चुकीची असल्याची टिप्पणी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. त्यानंतरही ‘बेस्ट’ने सदर कंत्राट रद्द केलेले नाही. त्यामुळे याबाबत पुढील कार्यवाही न करता हे कंत्राट रद्द करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा,” अशी विनंती अॅड. आशिष शेलार यांनी पत्राद्वारे केली आहे.
“उलट उच्च न्यायालयाच्या या निकालानंतरही ‘बेस्ट’ व्यवस्थापन सदर कंपनीलाच कंत्राट मिळावे, म्हणून मदत करीत असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे ही बाब गंभीर असून शासनाने तातडीने याप्रकरणी हस्तक्षेप करावा,” अशी विनंती अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.