कोरेगाव-भिमा प्रकरण : आनंद तेलतुंबडेने दिली माओवाद्याला भगत सिंगांची उपमा!

माओवादी श्रीधर श्रीनिवासनच्या स्मृतीसभेला हर्षाली पोतदारने उपस्थित असल्याची दिली कबुली

    14-Jul-2022
Total Views | 90

news



दि. ८ ऑक्टोबर, २०१५ रोजी मुंबईतील कार्यक्रमात हर्षाली पोतदार, शिक्षा सुनावण्यात आलेला माओवादी नेता एस श्रीधर याच्या स्मरणार्थ झालेल्या स्मृतीसभेचे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला सादर केलेले छायाचित्र.




मुंबई : केंद्र सरकारने बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचा प्रमुख नेता असलेल्या श्रीधर श्रीनिवासन याच्या स्मरणार्थ घेतलेल्या सभेत सहभागी झाल्याची साक्ष एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी असलेल्या हर्षाली पोतदारने दिली आहे. ११ आणि १२ जुलै रोजी झालेल्या कोरेगाव-भीमा आयोगाच्या मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावरील चौकशीवेळी पोतदार हिने साक्ष दिली आहे.
 
 
 
तसेच, याच श्रीधरच्या स्मरणार्थ लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगीही हजर असल्याची कबुलीही तिने दिली आहे. श्रीधरवर लिहिलेल्या पुस्तकात आनंद तेलतुंबडे यांनी त्याला आजच्या काळातील भगतसिंग, असे संबोधले होते, अशी माहिती आयोगापुढे उघड झाली आहे. पुण्यातील कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी नेमलेल्या आयोगापुढे ११ ते १५ जुलै दरम्यान पोतदार सह अन्य चार जणांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे. यात रवींद्र सेंगावकर, विश्वास नांगरे-पाटील, गणेश मोरे यांच्यासह सुवेझ हकी आदींची साक्ष नोंदविली जात आहे. 
 
 

कोण होता श्रीधर श्रीनिवासन ?
 
 
२००७ मध्ये याच माओवादी श्रीधर श्रीनिवासनला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने युएपीए कायद्यांतर्गत अटक केली होती. श्रीधरसह त्याचा साथीदार 'वर्नान गोन्साल्विस' यालाही अटक केली. स्फोटके बाळगल्याचा आरोपही त्याच्यावर होता. २०१३ साली या दोघांचीही सुटका झाली, पुढे ऑगस्ट २०१५ साली श्रीधरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. टाटा सामाजिक संस्थेचे माजी विद्यार्थी आणि रिपब्लिकन पँथर्स चळवळीच्या कार्यकर्त्यांनी मिळून दि. २ सप्टेंबर, २०१६ला मुंबईत श्रीधरच्या प्रथम स्मृतिदिनी सभा झाली.


या सभेतही हर्षाली उपस्थित असल्याचे तिने मान्य केले आहे. तिने या कार्यक्रमात रमेश गोलालासह गाणीही सादर केली होती. रमेशला २०१८ मध्ये दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती. त्याच्या याच कार्यक्रमात एस. श्रीधर : एका बुद्धिवादी क्रांतिकारकाचे चित्रण हे पुस्तक प्रकाशित झाले होते. पुस्तकात आनंद तेलतुंबडेने लेख लिहिला होता. एल्गार परिषद हिंसाचार प्रकरणात आत्तापर्यंत एकूण १५ जणांना माओवादाच्या आरोपाखाली अटक करण्यता आली असून एनआयए या प्रकरणाचा तपास करत आहे.
 
  
 
आनंद तेलतुंबडेने दिली श्रीधरला भगत सिंगांची उपमा!
 
आनंद तेलतुंबडेने श्रीधरवरील पुस्तकात लेख लिहिला असून त्यात त्यांनी श्रीधर हा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्याचा क्रांतीशी असलेला संबंध यांचा एक जिज्ञासू अभ्यासक होता. प्रत्येक युगात त्या त्या काळातील भगतसिंग असतो श्रीधरसारखा माओवादी हा नक्कीच आजच्या काळातील भगतसिंग होता, असे तेलतुंबडेने आपल्या लेखात म्हटले आहे. अॅड. प्रदीप गावडे यांनी आयोगासमोर हे पुस्तकच सादर केले आहे.
 
 
 
 
हर्षाली पोतदारच्या उलटतपासणीत काय उघड झाले?
 
हर्षाली पोतदारच्या उलटतपासणीत श्रीधर श्रीनिवासनच्या स्मृतीसभेला आपण हजर असल्याची कबुली तिने दिली. यावेळी तिला आनंद तेलतुंबडेंनी श्रीधरबद्दल केलेल्या वक्तव्याशी सहमत आहे का?, असे विचारले असता "तिने मी सांगू शकत नाही," असे सारवासारव करणारे उत्तर दिले यातून सरकारने बंदी घातलेल्या आणि सरकारविरोधी कारवाया करणाऱ्या संघटनेचा नेत्याला समर्थन होते हे उघड झाले आहे. 
 
 
एल्गार परिषदेतील आयोजकांमध्ये हर्षालीचा सामावेश!
  
दि. १ जानेवारी, २०१८ साली कोरेगाव भीमा येथे घडलेल्या हिंसाचाराच्या आदल्या दिवशी झालेल्या एल्गार परिषदेचे आयोजकांमध्ये हर्षालीचा समावेश होता. 



कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर एल्गार परिषद केस मधील आरोपी हर्षाली पोतदार हिच्या उलट तपासणी मध्ये ऍड प्रदीप गावडे यांनी सादर केलेल्या पुराव्यांवरून हर्षाली ही माओवादी पक्षाशी संबंधित असल्याचे दिसून येते. बंदी घातलेल्या भाकप(माओवादी) या दहशतवादी पक्षाचा व शिक्षा लागलेला केंद्रीय नेता श्रीधर श्रीनिवासन च्या मृत्यू नंतर त्याच्या स्मृती कार्यक्रमात हर्षाली पोतदार, सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग हे सक्रिय सहभागी होते. हर्षाली ने या कार्यक्रमात क्रांतीचे गीते गायली हे चौकशी आयोगासमोर उलटतपासणीत पुढे आले आहे. यावरून एल्गार परिषद आयोजकांचे माओवादी पक्षाशी असलेले लागेबंध उघड होतात. तसेच हे लोक स्वतःला आंबेडकरी विचारांचे असल्याचे भासवतात मात्र हे कम्युनिस्ट माओवादी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचे वेळोवेळी उघड झालेले आहे.
सागर शिंदे, राज्य संयोजक, विवेक विचार मंच, महाराष्ट्र
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121