मुंबई : सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युच्या तब्बल ७६० दिवसानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ने बुधवारी NDPS कोर्टामध्ये २८६ पानांचे मसुदा आरोपपत्र दाखल केले आहे. यातील २३७ पानांमध्ये तर ३३ आरोपींचे तपशीलवार जबाब नोंदवण्यात आले आहेत. या आरोपपत्रातील ४९व्या पानावर आरोपी क्र. १० म्हणजेच त्याची प्रेयसी रिया आणि आरोपी क्रमांक ७ म्हणजेच तिचा भाऊ शौविक आणि इतर आरोपींची जबाब सांगण्यात आला आहे.
सुशांतच्या मृत्यूला २ वर्ष पूर्ण झाली तरीही त्याच्या मृत्यचे गूढ अजून उकलेले नाही आहे. याच्या शोधात एनसीबीने ६२७२ पानांचे डिजिटल पुरावे, २२२६ पानांचे बँकेची कागदपत्रे आणि मोबाईल नंबरची सीडीही सादर केली आहे. २९६० कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करण्यात आली आहेत.
एनसीबीच्या या अहवालात रियाच्या नावाचा सुमारे ३२ वेळा उल्लेख करण्यात आला आहे. ड्रग्ज प्रकरणात दिपेश आणि रियाचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाले आहेत, असे शौविक, सॅम्युअलच्या जबाबात समजले. यासाठी दिपेश व रियाला ६ ते ८ सप्टेंबर २०२० रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. आणि याचसाठी त्यांना ८ सप्टेंबरला अटक देखील झाली होती. परंतु या सर्वाना जामीन मिळाला.
या पत्रात पुढे म्हटले आहे की १७मार्चला सुशांतच्याच सांगण्यावरून रियाचे एटीएम कार्ड वापरून तिचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा याने झैद विलात्रा नावाच्या व्यक्तीकडून ५ ग्रॅम गांजा १० हजार रुपयांना विकत घेतला होता. तर रिया आणि शौविकने दीपेश सावंतला ७ हजार रुपये देऊन कैझान इब्राहिमकडून चरस घेण्यास सांगितले होते.
पॉइंट क्रमांक ६३ मध्ये केलेल्या उल्लेखानुसार,१७ एप्रिल २०२० रोजी रिया आणि शौविक यांनी दिपेश सावंत याला कैझान इब्राहिमकडून चरस आणि गांजा घेण्यास सांगितले होते. त्यांच्या सांगण्यावरून माउंट ब्लँक बिल्डिंगजवळ संध्याकाळी चरस आणि गांजा डिलिव्हरी झाली. दिपेशने कैझानला ७ हजार रुपये दिले. हे पैसे त्याला रियाने दिले होते. रिया दीपेश सावंतला किराणा आणि गांजा खरेदीसाठी वेगळे पैसे देत असे. रियाने २५-२५ ग्रॅम गांजाची दोन पाकिटे खरेदी केली होती. त्यात एक पॅकेट शौविकसाठी विकत घेतले होते.
पॉइंट नंबर ७८ मध्ये लिहिले आहे की, ड्रग्जच्या फायनान्स ते मॅनेजमेंटपर्यंतची सर्व कामे रिया करत असे. १६ मार्च रोजी रिया चक्रवर्तीने सुशांत सिंह राजपूतसाठी ड्रग्ज खरेदी करण्यापूर्वी तिचा भाऊ शौविक, सॅम्युअल, दीपेश सावंत आणि इतरांसोबत बैठक घेतली होती. असे या अहवालात सांगण्यात आले