गडचिरोली पूर परिस्थिती : जादा बचाव पथके पाठवावी, स्थलांतरित नागरिकांची पुरेशी व्यवस्था करावी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्य मंत्रिमंडळात प्रशासनाला निर्देश

    14-Jul-2022
Total Views | 33
gad
 
 
 
 
 
 
 
 
 
मुंबई: गडचिरोली येथील पूर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन याठिकाणी नागरिकांचे स्थलांतर तसेच मदत कार्यासाठी तात्काळ अधिकची एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके त्याठिकाणी पाठवावी तसेच प्रसंगी बाजूच्या राज्यातूनही एनडीआरएफ पथक मागवावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा आढावा बैठकीत घेण्यात आला, यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. सिरोंचा येथे मेडीगट्टा बॅरेजेसचे सगळे उघडलेले 85 दरवाजे कमी न करण्याबाबत त्याचप्रमाणे श्रीपाद एलमपल्ली प्रकल्पाचे दरवाजे कमी न करण्याबाबत तेलंगणा सरकारला विनंती करावी तसेच गोसीखुर्द विसर्गाचे योग्य नियोजन झाले पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले. नागरिकांचे योग्य पद्धतीने स्थलांतर व्हावे तसेच त्यांना जेवण, पिण्याचे चांगले पाणी मिळावे तसेच त्यांच्यावर आवश्यकतेनुसार व्यवस्थित उपचार व्हावेत असे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला तसेच मदत पुनर्वसन विभागाला दिले
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121