मुंबई : राज्यातील वीज जोडणीप्रश्न तडीस फडणवीस - शिंदे सरकार तडीस नेणारच असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. याप्रश्नी सर्व वीज देयकांची थकबाकी भरण्यासाठी महावितरण आणि राज्य सरकार मिळून तोडगा काढतील आणि ती बिलं कशा पद्धतीने भरता येतील याची उपाय योजना आमचे सरकार लवकरच आणेल अशी घोषणाही फडणवीसांनी केली. राज्य सरकार हा थकबाकीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून गावांतील बंद पडलेल्या कृषीपंपांचा प्रश्न मार्गी लावू असेही त्यांनी सांगितले.
वीजदेयकांचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजनांच्या मार्फत निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी मिळून विदर्भातील पूर्वपरिस्थितीची पाहणी केली. त्या पार्श्वभूमीवर आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून आपत्तीग्रस्तांना तातडीची मदत देऊन, आवश्यक त्या सुविधा तयार करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीसांनी दिली आहे.