
मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना दिसणार आहे. एक नवी कोरी भूमिका घेऊन धनश्री तिच्या चाहत्यांच्या भेटीस येत आहे. झी मराठीवर येत्या १५ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या 'तू चाल पुढं' या मालिकेत धनश्री एका प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
आपल्या सोशल मिडिया अकाऊंट वरून धनश्रीने तिच्या मालिकेचा प्रोमो शेअर करुन तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. 'डोक्यात काय फॉल्टय काय?' असे म्हणणाऱ्या वाहिनीसाहेबांना पुन्हा एकदा खलनायिकेच्या भूमिकेत बघण्यासाठी आता तिच्या सकट तिचे चाहते देखील सज्ज झाले आहेत.
आपल्या सोशल मिडीयावरून पोस्ट शेअर करताना धनश्रीने म्हणतेय की, 'एका मोठ्या ब्रेकनंतर एक नवी व्यक्तिरेखा घेऊन येत आहे, तुमचं प्रेम असंच राहू द्या', अशा शब्दांमध्ये तिने भावना व्यक्त केल्या आहेत. या मालिकेत धनश्रीची भूमिका काय असेल हे अजून तिने सांगितले नाही. पण झी मराठीने या नवीन मालिकेच्या प्रदर्शित केलेल्या प्रोमोमध्ये धनश्रीची खलनायिकेची छटाअसल्याची झलक दिली आहे.
यापूर्वी धनश्री काडगावकरने 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत नंदिताची भूमिका साकारली होती. ही खलनायिकेची भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्ग आता तिची नवी भूमिका बघायला खूप उत्सुक आहे. त्यामुळे तिने शेअर केलेल्या या प्रोमोवर तिच्या चाहत्यांनी आणि कलाकार मित्रांनी तिला खूप शुभेच्छा दिल्या आहेत.