अमरनाथ दुर्घटनेत पुण्यातील दोघांचा मृत्यू

सांगलीतल्या ४७ जणांचा ग्रुप अडकला

    10-Jul-2022
Total Views | 80
amarnath yatra
 
 
पुणे : अमरनाथ येथील पवित्र गुफेच्या परिसरात शुक्रवारी ढगफुटी झाली. यामुळे अमरनाथ येथे दरड कोसळण्याची घटना घडली. यादुर्घटनेत आता पर्यत १६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत पुण्यातील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून यात एका महिलेचा समावेश आहे. खराब वातावरणामुळे बचावकार्यात अडथळे येत असून तिसऱ्यादिवशी देखील बचावकार्य चालू आहे.
 
 
अमरनाथ यात्रेसाठी पुण्यातून भाविक गेले होते. यातील एका बस मधील ५५ भाविकांमध्ये धायरी परिसरातील फॉरच्युन सोसायटीत राहणाऱ्या सुनीता महेश भोसले यांचा अमरनाथ दुर्घटनेत मृत्यू झाला. यात्रेसाठी गेलेले आणखी एक भाविक प्रदीप नाथा खराडे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची आहे. सांगलीतल्या ४७ जणांचा ग्रुप अमरनाथ यात्रेला गेला आहे. गुहेखाली तंबूमध्ये मुक्कामास होते त्यावेळी अचानक झालेल्या ढगफुटी मुळे त्यांचा तंबू जमिनीत गाडला गेला. पण दैव बलवत्त असल्याने कोणीही या दुर्घटनेत जखमी झाले नाही. सर्व साहित्य जमिनीखाली अडकले असून ४७ जण बेस कॅम्पला आले आहे.
 
 
अमरनाथ यात्रा पूर्णपणे स्थगित करण्यात आली आहे. शुक्रवारी झालेल्या ढगफुटीमुळे मोठा पूर आला. या पुरात गुफेखालील तंबू वाहून गेले. काही भागात दरड कोसळल्याने या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ७ पुरुष तर ६ स्त्रिया आहेत. २ मुत्यूदेहाची अद्याप ओळख पटली नाही. एनडीआरएफचे, एसडीआरएफ आणि बचाव पथकाच्या कामात खराब वातावरणामुळे अडथळा येत आहे. कोरोनामुळे २ वर्ष अमरनाथ यात्रा झाली नव्हती.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121