मुंबई : जागतिक पातळीवर सातत्याने महागाई वाढत असताना भारतीय अर्थव्यवस्था त्यापासून लांब राहू शकत नाही. रिझर्व्ह बँकेने नेमके याचीच जाणीव आपल्या पतधोरण बैठकीत करून दिली. रिझर्व्ह बँकेने यंदाही व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. रेपो रेट मध्ये ०.४० टक्क्यांची वाढ करत महागाईला आटोक्यात आणण्यासाठी आपण कठोर पावले उचलत आहोत हे दाखवून दिले. आता सुधारित रेपो रेट ४.९० टक्के असणार आहे.
या वाढलेल्या व्याजदरांचा फटका देशातील सर्वच कर्जदारांना बसणार आहे. यावेळी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ५० बेसिस पॉईंट्स म्हणजेच ०.५० टक्के वाढ केली आहे. रेपो दरात वाढ झाल्याचा सरळ अर्थ असा होतो की, बँकांना रिझर्व्ह बँकेकडून महागड्या दराने कर्जे मिळतील. अशा परिस्थितीत बँका ही वाढ ग्राहकांवर हस्तांतरित करतील आणि कर्ज घेण्याचे दरही त्यांच्यासाठी महाग होतील. दुसरीकडे, जर तुम्ही गृहकर्ज चालवत असाल, तर तुम्हाला त्याची ईइमआय वाढलेली दिसेल. याचा फायदा बँक एफडी मिळवणाऱ्यांना होईल, कारण यामुळे एफडीचे दरही वाढतील.