नवी दिल्ली : लोकसभेच्या संसदीय विशेषाधिकार समितीने खासदार नवनीत राणा यांच्या विशेषाधिकार भंगाच्या तक्रारीप्रकरणी महाराष्ट्राचे मुख्य सचिव, राज्याचे पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलिस आयुक्त यांना १५ जून रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी त्यांना झालेल्या अटकेविरोधात लोकसभा विशेषाधिकार समितीकडे तक्रा नोंदविली होती. भाजप खासदार सुनील सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समिती पुढील आठवड्यात खासदार नवनीत राणा यांच्या विशेषाधिकार भंगाच्या तक्रारीची दखल घेणार आहे. राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर समितीने महाराष्ट्रातील अनेक अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. त्यामुळे येत्या १५ जून रोजी महाराष्ट्राचे मुख्य सचिव, महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक आणि मुंबईचे पोलिस आयुक्त यांना चौकशीसाठी समन्स बजाविले आहे.