‘काश्मीर फाईल्स’ला विरोध मग...

    07-Jun-2022   
Total Views | 64
 
kashmiri pandit
 
 
 
जम्मू-काश्मीरमध्ये सध्या काश्मिरी पंडितांवर, हिंदू मंदिरांवर होणारे हल्ले हे सर्वस्वी दुर्देवीच. अशाप्रकारे काश्मीरमध्ये ‘टार्गेटेड किलिंग’च्या नावाखाली झालेल्या हिंदूंच्या निर्घृण हत्येची केंद्र सरकारनेही गंभीर दखल घेतली आणि या घटनांशी संबंधित दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळायला प्रारंभही केला. पण, काश्मिरी पंडितांच्या या प्रश्नावरुन अपेक्षेप्रमाणे राजकीय विरोधाचे सूर दिल्ली ते मुंबई घुमू लागले. या मुद्द्याचे भांडवल करुन एरवी सेक्युलरवादी मिरवणारे लगोलग हिंदुत्वाचा राग आळवू लागले. भाजपच्या काळातही काश्मीरमध्ये हिंदू कसे सुरक्षित नाहीत, ‘कलम-३७०’ रद्द करुन उपयोगच काय वगैरे वगैरे आरोप-प्रत्यारोपांना ऊत आला. पण, काश्मिरी पंडितांविषयी जर खरंच या पक्षांना इतकी आपुलकी वाटत होती, तर मग नव्वदच्या दशकातील काश्मिरी पंडितांचा नरसंहार मोठ्या पडद्यावर दाखवणार्‍या ‘द काश्मीर फाईल्स’ला यांनी प्रखर विरोध का केला? याचे उत्तर केजरीवाल, राऊत आणि ठाकरेंनी आधी द्यावे आणि मग काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेविषयी, जीविताविषयी चिंता वाहण्याचे राजकीय नाटक करावे. ‘द काश्मीर फाईल्स’ ‘टॅक्स फ्री’ करण्याची मागणी दिल्लीत केजरीवाल सरकारने फेटाळून लावली होती. ‘टॅक्स फ्री का करु, हवं तर निर्मात्यांनी हा चित्रपट युट्यूबवर फुकटात दाखवावा’ म्हणत केजरीवालांनी या चित्रपटाची खिल्ली उडवली होती. पण, सत्तेत आल्यापासून त्यांनी फारसा गंभीर आशय नसलेले असे कित्येक चित्रपट दिल्लीत ‘टॅक्स फ्री’ही केले होते. त्यानंतर केजरीवाल मोठ्या प्रमाणात ट्विटरवर ट्रोेलही झाले. इतकेच नव्हे, तर महाराष्ट्रातही या चित्रपटामुळे दोन समाजांत तेढ निर्माण होईल, असे सांगत या चित्रपटाला भाजपप्रणीत ठरवण्याचाच खटाटोप महाविकास आघाडी सरकारने केला.
 
 
तसेच, सध्या जे काही काश्मीरमध्ये सुरू आहे, त्याचे खापरही याच चित्रपटावर फोडण्याचे उद्योगही राऊतांसारख्या विश्वप्रवक्त्याने केले. पण, काश्मिरी पंडितांच्या वेदनांना वाट मोकळी करुन देणार्‍या ‘काश्मीर फाईल्स’ला विरोध करणारे मात्र आज याच पंडितांसाठी माध्यमांसमोर नक्राश्रू ढाळण्याचा ढोंगीपणा करताना दिसतात. त्यामुळे सेक्युलॅरिझमच्या आड अधूनमधून येणारा हा हिंदूंच्या हक्कांचा पुळका ही मनस्वी तळमळ अजिबात नव्हेच, तर ही केवळ एक राजकीय चालच आहे, हे सर्वसामान्यांनाही समजलेले बरे!
 
काश्मिरी पंडितांच्या नावाने नक्राश्रू का?
 
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवालांनी मृत काश्मिरी पंडितांच्या एका बॅनरला फुलं अर्पण करुन नुकतेच राजकीय सोपस्कार पार पाडले खरे. त्यानंतर काश्मिरी पंडितांविषयीच्या फुटकळ सहवेदनाही त्यांनी व्यक्त केल्या. ‘आता या प्रश्नावरुन मिटिंग नको, अ‍ॅक्शन हवी’ म्हणत केंद्र सरकारवर त्यांनी आरोपबाजीही केली. पण, काश्मिरी पंडितांविषयी खरंच केजरीवालांना काही करावेसे वाटत असेल, तर अशा पलायन करणार्‍या पंडितांना त्यांनी राजधानीत घरं आणि नोकरी देण्याचे ठोस आश्वासन द्यावे. फक्त विरोधासाठी विरोध न करता, केजरीवालांनीही मग फुल ना फुलाची पाकळी म्हणून पंडितांना दिलासा देण्यासाठी तोंडाची वाफ न दवडता मदतीचा हात देऊन ‘अ‍ॅक्शन’ दाखवावी. खरंतर दिल्लीतही बरेच काश्मिरी पंडित नव्वदच्या दशकापासून वास्तव्यास आहेत. पण, केजरीवालांनी यापूर्वी त्यांची विचारपूस केल्याची तसदी घेतल्याचे ऐकिवात नाही. याउलट मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून काश्मिरी पंडितांना त्यांच्याच हक्काच्या जन्मभूमीत वसवण्याचा, नोकरी, घरे, अधिकार देण्याचा पुरेपूर प्रयत्नही केली. त्याला यशही आले. हजारो काश्मिरी पंडित आपल्या मूळ भूमीत परतलेही. पण, आज दुर्दैवाने दहशतवादाने पुन्हा डोकेवर काढल्यानंतर पंडितांसमोर दुसरा पर्याय उरलेला नाही. सरकारी नोकरीत असलेल्या पंडितांच्या बदल्या आता सुरक्षित स्थळी करण्यात आल्या असून त्यांना सुरक्षाही प्रदान केली जात आहेच. पण, प्रत्येक वेळी या प्रश्नाकडे केवळ राजकीय चष्म्यातून न बघता मानवी हक्क आणि संवेदनांच्या माध्यमातूनही पाहणे तितकेच महत्त्वाचे. पण, केजरीवालांसारखे संधीसाधू काश्मिरी पंडितांच्या हत्यांचा फक्त निषेध करतात. परंतु, या हत्यांमागील इस्लामिक दहशतवादाविषयी एक चक्कार शब्द उचारण्याची त्यांची हिंमत का होत नाही? दिल्ली सरकारच्या शाळा, आरोग्य सुविधा, सुरक्षितता यांचा गाजावाजा करणारे केजरीवाल मग अशा काश्मिरी पंडितांसाठी दिल्लीत आता एखादा राज्य सरकारचा भूखंड राखीव ठेवणार का? नव्वदच्या दशकात राजकीय सत्ता नसतानाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी काही काश्मिरी पंडितांना आर्थिक मदत, तर त्यांच्या मुलांना शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण देऊ केले होते. पण, आज आपल्याच आमदारांना नजरकैदेत ठेवण्याची वेळ आलेली शिवसेना काश्मिरी पंडितांना महाराष्ट्रात सुरक्षित छत्र तरी देऊ शकेल काय?
 
 
 
 
 

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची
अग्रलेख
जरुर वाचा
Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत चोख प्रत्युत्तर देण्यास बुधवार, दि. ७ मे रोजी सुरुवात केली. त्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ९ ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. अशातच आता सीमावर्तीभागात भारतीय लष्कराच्या जोरदार हालचाली होताना दिसतायत. पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे परंतु भारताची अत्याधुनिक यंत्रणा पाकिस्तानचा प्रयत्न अयशस्वी करत आहेत. अशातच भारत-पाकिस्तान युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. पाकिस्तानला तात्काळ मागे हटण्याचे आणि भारतासोबतचा तणाव त्वरित कमी करण्याचे आदेश अमेरिक..

Operation Sindoor LIVE updates : पाकिस्तानकडून हल्ल्यासाठी हमाससारख्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न!

Operation Sindoor LIVE updates : पाकिस्तानकडून हल्ल्यासाठी हमाससारख्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न!

पाकिस्तानी लष्करातर्फे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना हमासप्रमाणे हल्ले करण्यात येत आहेत. खात्रीलायक संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया येथे ८ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. मात्र, भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी पाकची सर्वच क्षेपणास्त्रे अडवून निष्प्रभ केली. जम्मूवर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना बघितल्यास ती दृश्ये इस्रायलवरील हमास शैलीच्या हल्ल्याची आठवण करून देतात. हमासतर्फेही इस्रायलर अतिशय किरकोळ दर्जाची क्षेपणास्त्रे डागण्यात येत असतात. विशेष ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121