मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर होते मात्र, अस्वस्थामुळे त्यांनी आपला दौरा अर्धवट सोडून शनिवारी मुंबईत दाखल झाले. त्यानंतर आज त्यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. "कोविड टेस्ट केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे आणि उपचार सुरू आहेत. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोविड टेस्ट करुन घ्यावी", देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत म्हटले.
शुक्रवारी मुंबईतील कार्यक्रम आटोपून रात्री लातूरच्या दिशेला निघाले. लातूरमध्ये आल्यावर शनिवारी सकाळीदेखील त्यांना ताप होता. त्यांनी औषधं घेतली होती. पण तरीही त्यांचा ताप कमी झालेला नव्हता. फडणवीस लातूरच्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांनी मंचावरुन भाषणही केलं. या कार्यक्रमादरम्यानच आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी फडणवीस यांना १०२ इतका ताप असल्याची माहिती कार्यकर्त्यांना दिली होती.