अंबरनाथ-बदलापूरकरांनो, पाणी गाळून आणि उकळून प्या

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे आवाहन

    30-Jun-2022
Total Views | 76

ulhas river 
 
 
 
अंबरनाथ : उल्हास नदीत येणार्‍या पावसाच्या पाण्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाले आहे. नदीवरील पाणी शुद्धीकरण केंद्राच्या प्रक्रियेवर त्याचा परिणाम होत असून गाळामुळे नागरिकांना पुरवल्या जाणार्‍या पाण्याचाही रंग बदलला आहे. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूरमधील नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून पिण्याचे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्यातर्फे करण्यात आले आहे.
 
 
 
जून महिना संपत आला तरी ठाणे जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मात्र, आसपासच्या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होत असल्याने उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पाण्याच्या पातळीसोबतच नदीतील पाणीही गढूळ झाले आहे. बदलापूर शहरात उल्हास नदीवर बॅरेज बंधारा असून तिथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे पाणी शुद्धीकरण केंद्र चालवले जाते. ज्याद्वारे बदलापूर व अंबरनाथ शहराच्या काही भागात पाणी पुरवले जाते.
 
 
 
अंबरनाथमध्ये जीवन प्राधिकरणाच्या पाण्यासोबतच ‘एमआयडीसी’ आणि चिखलोली धरणातूनही पाणीपुरवठा होतो. या बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रातून काही दिवसांपासून बदलापूर, अंबरनाथ शहराला होणारा पाणीपुरवठा गढूळ असल्याचे समोर आले आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून गढूळ पाण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर प्राधिकरणाने पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

(Tahawwur Rana's NIA Interrogation Begins) २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. गुरुवारी १० एप्रिलला रात्री राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे एनआयएने २० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने एनआयएला राणाची १८ दिवसांची कोठडी दिली. ताब्यात घेतल्यानंतर, तहव्वूर राणाची आता एनआयए मुख्यालयात चौकशीला सुरुवात झाली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121