मुंबई : तुम्ही अद्यापही पॅनकार्डला आधारकार्डशी लिंक केलं नसेल तर हे काम तात्काळ करून घ्या. ३० जून पूर्वी पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक नसेल तर ५०० रुपये दंड होऊ शकतो. त्यानंतर जर पॅनकार्ड, आधार कार्ड ला लिंक नसेल तर १००० रुपये दंड भरावा लागणार आहे. घरबसल्या पॅनकार्ड आधारकार्डला आयकर विभागाच्या पोर्टलवर लिंक कसे करायचे? या बाबत जाणून घेऊया.
१. पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक कसे कराल ?
२. आयकर विभागाची अधिकृत वेबसाईड incometaxindiaefiling.gov.in वर लॉगिन करा.
३. यावर आधार लिंकवर की क्लिक करा. पॅन वर आधार नंबर टाका. यानंतर वॅलिडेट वर क्लिक करा.
४. जर पॅन आणि आधार लिंक होत नसेल तर पेमंटकरीता NSDL च्या वेबसाईड वर जा. तेथे चलन नंबर टाकून पुढे प्रोसीड करा.
५. नवीन पेज ओपन झालयावर त्यात टॅक्स अँप्लिकेबल वर क्लिक करा. टाईप ऑफ पेमंट मध्ये Other Receipts निवडा.
६. तुमच्या सोयीनुसार बँकिंग किंवा डेबिट कार्ड द्वारे तुम्ही अकऊंट नंबर आणि पॅन नंबर टाकून २०२३ - २०२४ मध्ये पेमंट करू शकता.
७. तुमचा पत्ता आणि कॅप्चा कोड टाकून प्रोसिड करू शकता. स्क्रीन वर तुम्ही टाकलेली सर्व माहित तुम्हाला दिसेल.
जर माहितीमध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्ही एडिट वर क्लिक करून माहितीमध्ये बदल करू शकता.