चौसिंघ्याची ९० मिनटात सुटका
वन विभागाच्या प्रयत्नांना यश
28-Jun-2022
Total Views | 54
मुंबई (प्रतिनिधी): साताऱ्यातील दरे गावाजवळ खोल विहिरीतून एका मादी चौसिंघ्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सातारा वन विभाग आणि 'रेस्क्यू' पुणे यांनी ९० मिनटात या चौसिंघ्याची सुटका केली. वैद्यकीय तपासणी नंतर तिला जवळच्याच जंगलात सोडण्यात आले.
ही मादा चौसिंघा ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने घटनेची माहिती वन विभागाला दिली. पुण्यातील 'रेस्क्यू' संस्थेचे कर्मचारी, आणि वन विभगाचे वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या चौसिंघ्याला उभे राहण्यासाठी ठोस जमीन उपलब्ध व्हावी यासाठी विहिरीतील पाणी काढण्यात आले. हे संपूर्ण बचाव आणि सुटका कार्य ९० मिनिटांत करण्यात आले. घटनास्थळी, परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. आणि त्यानुसार विहिरीत उतरून या प्राण्याचा बचाव करण्याचे ठरले. दोरीच्या सहाय्याने खाली उतरून या चौसिंघाला जाळ्यात अडकवण्यात आले. हे चौसिंघा विहिरीच्या भिंतींवर चढण्याचा अतोनात प्रयत्न करत होती. चौसिंघाचा तणाव कमी त्याच्या डोळ्यावर फडके टाकण्यात आले.आणि नंतर सुखरूप विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
या मादी चौसिंघाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ती गर्भवती असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. यानंतर तिला जंगलात सुखरूप सोडण्यात आले. या मोहिमेत सातारा वन परिक्षेत्र अधिकारी निवृत्ती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नरेश चांडक, अमित तोडकर आणि नितीन श्रीकुमार यांच्यासह तांत्रिक वन्यजीव बचाव पथकाचा सहभाग होता.