मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कट्टर शिवसैनिकांनी मालवणीत सरकार सत्तेत रहावं म्हणून दुवा मागितली आहे. नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी तब्बल ५० आमदारांचे आम्हाला समर्थन असल्याचा दावा केला आहे. ठाकरे सरकारचा पाठींबा काढून घेण्याचा इशाराही शिंदे गटाने दिला असून तसे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे ठिकठिकाणी शिवसैनिकांनी शक्तीप्रदर्शन सुरू केले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्याविरोधातही आंदोलन सुरू केले. मालवणीतील शिवसैनिकांनी 'कुराण-ए-शरिफ' वाचन केले आहे. तसेच शिवसेना सत्तेत टीकून रहावी यासाठी मुलांनी अल्लाहकडे दुआ मागितली आहे. मालवणी शाखा प्रमुख अमीरुद्दीन यांनी कुरानख्वानी आयोजित केली होती. ठाकरे सरकार काँग्रेस-राष्ट्रवादीसह सत्तेत रहावी, अशी दुआ त्यांनी केली.
दरम्यान, याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेवर टीका होऊ लागली आहे. "पालघर साधु हत्याकांड प्रकरणातील मृतात्म्यांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. त्यातच आता शिवसेना मालवणी शाखा प्रमुख कुराणख्वानी आयोजित करत आहेत.", अशी टीका भाजपच्या प्रिती गांधी यांनी लगावला आहे.