नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, दि. १९ जून रोजी प्रगती मैदान एकात्मिक संक्रमण मार्गिका प्रकल्पाचा मुख्य बोगदा आणि पाच भुयारी मार्ग राष्ट्राला समर्पित केले. एकात्मिक संक्रमण मार्गिका प्रकल्प हा प्रगती मैदान पुनर्विकास प्रकल्पाचा अविभाज्य भाग आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, हरदीप सिंग पुरी, सोम प्रकाश, अनुप्रिया पटेल आणि कौशल किशोर यावेळी उपस्थित होते. या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, “हा प्रकल्प म्हणजे केंद्र सरकारकडून दिल्लीतील जनतेसाठी मोठी भेट आहे. वाहतूककोंडी आणि महामारीमुळे प्रकल्प पूर्ण करण्यात किती मोठे आव्हान होते, याचे त्यांनी स्मरण केले. प्रकल्प पूर्ण करण्याचे श्रेय त्यांनी नवीन भारताच्या नवीन कार्यसंस्कृतीला, कामगार आणि अभियंत्यांना दिले. हा एक नवीन भारत आहे जो समस्या सोडवतो, नवीन प्रतिज्ञा घेतो आणि त्या प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम करतो,” असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
‘पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत् आराखडा दृष्टिकोना’द्वारे देश मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटी निर्माण करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ‘पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखडा’ हा सबका विश्वास आणि सबका प्रयासचे माध्यम आहे, असे त्यांनी सांगितले. “धर्मशाला येथे नुकत्याच झालेल्या मुख्य सचिवांच्या परिषदेत त्यांना माहिती देण्यात आल्याप्रमाणे, राज्यांनी गतिशक्तीचा अवलंब केल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. ‘अमृत काल’ दरम्यान, देशातील मेट्रो शहरांची व्याप्ती वाढवणे आणि ‘श्रेणी-२’, ‘श्रेणी-३’ शहरांमध्ये चांगल्या नियोजनासह काम करणे आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला. येत्या २५ वर्षांत भारताच्या जलद विकासासाठी आपल्याला शहरे हरित, स्वच्छ आणि पर्यावरणस्नेही बनवण्याची गरज आहे. आपण शहरीकरणाला आव्हान म्हणून न पाहता संधी म्हणून स्वीकारले, तर ते देशाच्या विकासाला अनेक पटींनी हातभार लागेल,” असे पंतप्रधान म्हणाले.
कोणत्याही सरकारकडून नागरी नियोजनाला प्रथमच महत्त्व
“प्रथमच, कोणतेही सरकार इतक्या मोठ्या प्रमाणावर नागरी नियोजनाला महत्त्व देत आहे,” यावर पंतप्रधानांनी भर दिला. “शहरी गरिबांपासून शहरी मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वांना चांगल्या सुविधा देण्याचे काम केले जात आहे. गेल्या आठ वर्षांत १ कोटी, ७० लाख शहरी गरिबांना पक्की घरे सुनिश्चित करण्यात आली आहेत. लाखो मध्यमवर्गीय कुटुंबांना त्यांच्या घराच्या बांधकामासाठी साहाय्यही करण्यात आले आहे. शहरांमध्ये आधुनिक सार्वजनिक वाहतुकीवर लक्ष केंद्रित केल्यास ‘सीएनजी’आधारित वाहतूक आणि इलेक्ट्रिक वाहतुकीच्या पायाभूत सुविधांनाही प्राधान्य दिले जात आहे. केंद्र सरकारची फेम योजना हे त्याचे उत्तम उदाहरण आहे,” असेही पंतप्रधानांनी सांगितले.