हिंदुस्थान आणि हिंदुंच्या रक्षणकर्त्याच्या चरणी नतमस्तक होण्याचे सौभाग्य मला लाभले : शंकर गायकर

    16-Jun-2022
Total Views | 79

Raigad
 
 
 
 
रायगड : रायगडावर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, रविवार दि. १२ जून २०२२ रोजी तिथीनुसार भव्यदिव्य ३४९वा हिंदू सम्राज्य दिन सोहळा अर्थात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात श्री शिवराज्याभषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड, शिवराज्याभिषेक सोहळा मुंबई समिती, महाड समिती, विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत व रायगड स्मारकव्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. या सोहळ्यासाठी १५२ बसेस व ४८ चार चाकी वाहनातून विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे ८५०० कार्यकर्ते तसेच पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे १००० कार्येकर्ते रायगड येथे सोहळ्यात सहभागी झाले होते. गडावरील वातावरण भारावलेले व उत्साहपूर्वक होते. या सोहळ्याप्रसंगी सकाळी कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर शिवप्रतिमा पूजन, अभिषेक व सिंहासनारोहण तसेच पालखी मिरवणुकसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या घोष पथकाचीही महाराजांना मानवंदना देण्यात आली.
 
 
 
हिंदू साम्राज्याच्या या ३४९ वर्षांच्या स्मरणार्थ रायगडावर खा. श्रीकांत एकनाथ शिंदे, आ. भरतशेठ गोगावले, माजी आमदार रुपेश म्हात्रे (भिवंडी) आणि मा. श्री. शंकरजी गायकर यांना पाहुणे म्हणून खास निमंत्रित करण्यात आले होते. "हिंदुस्थान आणि हिंदूंच्या रक्षणकर्त्याच्या चरणी नतमस्तक होण्याचे सौभाग्य मला लाभले आहे. आई, माती, संसार हेतु व्यक्तीचे कर्तव्य हे शंभर पटीने मोठं आहे, याचा साक्षत्कार झाला. रायगड हा केवळ बालेकिल्ला नाही तर तो गडांचा सरदार, राजा आहे", असे शंकर गायकर (मुंबई क्षेत्र मंत्री, विहिंप) यावेळी म्हणाले.
 
 
 
"जगाच्या इतिहासात अगणित सम्राट होऊन गेले, पण आज किती देश त्यांची आठवण ठेवतात? पण जगणारे जीवन हेच राष्ट्र आहे, तोच धर्म आहे, तेच सत्य आहे, ते पिढ्यानपिढ्या स्मरणात राहतात. छत्रपती शिवाजी महाराज हे भाषण नसून, मानवी समाजासाठी तो चमत्कार आहे. हरवलेल्या समाजाचा राष्ट्राचा अभिमान आहे. झोपलेल्या समाजाला जागृत करणे, आपल्या सत्त्वगुण अस्मितेची ओळख करून देणे, संघर्ष करत पुढे जाणे हे महानतेचे लक्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्यात नाहीत पण संपूर्ण चरित्र आपल्या समोर आहे, लढण्याचे धाडस सदैव मिळणार आहे. आजचा हाच खूप मोठा संदेश आहे." श्री. शंकरजी गायकर यांच्या भाषणाने तमाम शिवभक्तांचे मन प्रभावित केले तसेच श्री. सौरभ कर्डीले यांनी शिवराय व मावळ्यांचा प्रभावी इतिहास मांडला.
 
 
 
या प्रसंगी विविध भागातून आलेल्या शिवभक्तांच्या भोजनाची व्यवस्था अतिशय स्वादिष्ट होती. सातहजार पेक्षा जास्त शिवभक्तांनी वि.हि.प कोकण प्रांत यांनी रायगडाच्या पायथ्यांशी पाचाड जंक्शन येथे कार्यकर्त्यांसाठी महाप्रसादाची सोय केली होती. सर्व शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच दि. ११ जून रोजी ६०० जणांची रात्रीच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. भोजन व्यवस्थेत शरदजी गांगल यांनी प्रचंड मेहनत घेऊन भोजन व्यवस्था यशस्वी केली. शिवराज्याभिषेक सोहळा हा मुंबई समिती, तसेच महाड समिती, वि.हि.प. कोकण प्रांत, रायगड स्मारकव्यवस्थापन समिती अध्यक्ष, आंग्रे आणि सुधिर थोरात, राजेंद्र पवार, विहिंप, कोकण प्रांत सह मंत्री, संदीप भगत, बजरंग दल संयोजक, कोकण प्रांत, संदेश भेगडे, पुणे ग्रामीण विभाग बजरंग दल, संयोजक याचे अचुक नियोजनयांच्या मुळे शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात संपन्न झाला.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121