नवी दिल्ली: कोरोना महामारीने कार्यालयात जाणाऱ्यांना घरून काम करण्यास भाग पाडले होते. पण विमानसेवा क्षेत्राची ही परिस्थिती नव्हती. कोरोनाव्हायरसच्या सुरवाती दरम्यान आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवासावर पूर्ण बंदी होती. मागची २ वर्षे तोट्यात गेल्यानंतर '३६० अंश बदल' झाल्याचे देशातील प्रमुख कंपनी असलेल्या इंडिगोने म्हटले आहे. कॉर्पोरेट किंवा व्यावसायिक प्रवासाची मागणी लवकरच महामारी पूर्वी पेक्षा अधिक वाढू शकते, असेही ते म्हणाले.
इंडिगोच्या मुख्य महसूल अधिकारी संजय कुमार यांच्यानुसार, इंडिगोचे भारतातील ५६% विमानसेवा क्षेत्रावर नियंत्रण आहे. या कंपनीने एप्रिल आणि मे महिन्यात कॉर्पोरेट आणि व्यावसायिक प्रवासात १००% पुनर्प्राप्ती पाहिली आणि ही मागणी लवकरच महामारीपूर्वीच्या पातळीला ओलांडू शकते. कोरोना महामारीनंतर, अधिक प्रवासी ट्रेनने प्रवास न करता, विमानाने प्रवास करत आहेत. संजय कुमार यांच्या मते मीटिंग, कॉन्फरन्स आणि एक्सहिबिशन हे कॉर्पोरेट आणि व्यावसायिक प्रवासाची मागणी वाढण्यामागचे काही प्रमुख कारणे आहेत.