'हे काफिर आहेत, यांना सोडू नका'! म्हणणाऱ्या इमामाला अटक

प्रयागराजमधील अटाला मशिदीच्या इमामाला अटक; फिरोजाबादमध्ये दंगलखोरांचे पोस्टर.

    14-Jun-2022
Total Views | 144
UP
 



वाराणसी:
प्रयागराज येथील बडी अटाला मशिदीच्या इमाम अली अहमद याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर शुक्रवार दि. 10 जून रोजीच्या नमाजानंतर जमावाला भडकवल्याचा आरोप आहे. इमाम यांनी पोलिसांना काफिर म्हणत त्यांच्यावर हल्ला करण्यास प्रवृत्त केले होते. त्यानंतर झालेल्या हिंसाचार आणि जाळपोळीबाबत नोंदवलेल्या ;एफआयआर'मध्ये इमामचे नाव आहे. इमामला रविवारी दि.१२ रोजी अटक करण्यात आली.
 

इमाम अली अहमद यांनी भडकवल्यानंतर जमावाने पोलिसांवर दगडफेक सुरू केली. यानंतर हिंसाचार सुरू झाला. यामध्ये अनेक अधिकारी आणि पोलीस जखमी झाले. प्रयागराज हिंसाचारात अटक करण्यात आलेल्या इमाम अली अहमद आणि जावेद पंप यांच्या बरोबरच झीशान रहमानी, सारा अहमद, काउन्सिलर मोईनुद्दीन आणि डाव्या विचारसरणीचे आशिष मित्तल हे मुख्य आरोपी आहेत. उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.



अली अहमदने जमावाला भडकवण्यासाठी मशिदीच्या लाऊडस्पीकरचा वापर केला. पोलिसांकडे बोट दाखवत ते काफिर आहेत, त्यांना सोडू नका, असा आरोप केला जात आहे. अली अहमदची पोलिस चौकशी सुरू आहे. या प्रकरणात 80 आरोपी आहेत. तसेच 5 हजार अज्ञात आरोपी आहेत. जावेद पंपानंतर AIMIM प्रयागराजचे जिल्हाध्यक्ष शाह आलमही पोलिसांच्या रडारवर आहेत.



फिरोजाबादमधील पोस्टर्स


फिरोजाबादमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर दंगलखोरांचे पोस्टर्स चिकटवण्यात आले आहेत. पोस्टरमध्ये दिसलेल्या १८ आरोपींची ओळख पटवून त्यांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती आणि सुगावा देणाऱ्यांचे नाव व इतर माहिती गुप्त ठेवण्याचे आश्वासनही पोलिसांनी दिले आहे. फिरोजाबादमध्ये 8 नावाजलेल्या आणि 80 अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121