पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात रेल्वे स्टेशनची तोडफोड; लोकल ट्रेनवर हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2022   
Total Views |
Kolkata
 
 
कोलकत्ता: भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरून पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरू आहे. पश्चिम बंगाल राज्यातील बेथुआदहरी रेल्वे स्टेशन आणि ट्रेनवर जमावाने हल्ला केला. काल दि. १२ रोजी संध्याकाळी, पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील बेथुआदहरी रेल्वे स्थानकावर इस्लामी जमावाने हल्ला केला. तसेच स्थानकावरील लोकल ट्रेनचे नुकसान केले.
 
 
Kolkata१
काल दि. १२ रोजी नादियामध्ये भाजप नेत्याच्या टीकेला विरोध करणारा निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या विरोध मोर्च्याला सुरुवातीपासूनच हिंसक वळण लागले. आणि बेथुआदहरी मार्केटमधून जात असताना दुकानांची तोडफोड केली. दंगलीमुळे राष्ट्रीय महामार्ग ३४ बराच काळ पूर्णपणे ठप्प झाला होता. पोलीस घटनास्थळी हजर असतानाही त्यांना परिस्थिती नियंत्रणात आणता आली नाही. यादरम्यान जमावाचा एक भाग जवळच्या बेथुआदहरी रेल्वे स्थानकात घुसला. आणि स्टेशनची तोडफोड करण्यास सुरुवात केली. काही क्षणानंतर अप 'कृष्णनगर लालगोला' लोकल ट्रेन स्थानकावर आली आणि जमावाने ट्रेनवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. हल्ल्यामुळे लालगोला मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. सुमारे दीड तासानंतर कृष्णानगर-रामपूर मार्गावर गाडी धावू लागली.
@@AUTHORINFO_V1@@