भाजपचे मिशन 'राष्ट्रपती'

जे. पी. नड्डा आणि राजनाथ सिंह यांच्यावर मोठी जबाबदारी

    12-Jun-2022
Total Views | 153

jp N & RS
 
 
 
 
मुंबई : जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यासाठी भाजपनेदेखील जोरदार तयारी सुरु केली आहे. राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडण्यासाठी भाजप एनडीएमधील मित्र पक्षांबरोबर चर्चा करणारा असल्याचे वृत्त हाती येत आहे. त्याशिवाय यूपीएच्या मित्रपक्षांसोबत आणि अपक्षांसोबतही भाजप चर्चा करणार आहे. या चर्चेची जबाबदारी भाजपने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर सोपवली आहे.
 
 
 
केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ तारखेला मतमोजणी होणार आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी तसेच विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. अनेक छोट्या, मोठ्या पक्षांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी चुरस रंगली आहे. रविवारी भाजपने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर राष्ट्रपती पदाच्या निवडणूकबाबत एनडीएचे मित्रपक्ष, अपक्ष आणि युपीएच्या मित्रपक्षांसोबत चर्चा करण्याची मोठी जबाबदारी सोपवली आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121