नवी दिल्ली : एशिया चषक स्पर्धेत भारताने जपानचा १-० पराभव करत कांस्यपदक पटकावले आहे. पहिल्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच राजकुमार पालने भारताला आघाडी मिळवून दिली आणि त्यानंतर त्यांनी आघाडी कायम राखली. जपानला सात पेनल्टी कॉर्नर मिळाले तर भारताला फक्त दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण भारताने सर्कल पेनिट्रेशनच्या आकडेवारीत ११-१० ने आघाडी घेतली. सामन्याच्या शेवटच्या मिनिटात भारत १० पुरुषांवर खाली होता, परंतु त्यांनी एशिया चषक स्पर्धेत आपले दुसरे कांस्य पदक जिंकले.
सुपर ४ मध्ये भारतीय संघाने जपानचा पराभव केला होता. त्यामुळे कांस्य पदाकाच्या सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. भारतीय संघाने मनोबल शिखरावर होते. पहिल्या सहा मिनिटांतच भारतीय संघाने गोल करत आघाडी घेतली होती. भारतीय संघाने अखेरपर्यंत ही आघाडी कायम ठेवली. राजकुमारने जापानविरोधात पहिला आणि एकमेव गोल करत भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली.. भारतीय संघाने पहिल्या कॉर्टरच्या अखेरपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली.