रुग्णांना मदतीचा हात देणारी संस्था

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2022   
Total Views |

sanstha
 
 
 
 
 
प्रखर हिंदुत्ववादी आणि हिंदू जनजागृती आंदोलन उभारलेल्या समाजोन्नतीच्या धैर्याने झपाटलेल्या, रा. स्व. संघाच्या विचाराची शिदोरी घेतलेल्या नानासाहेब पुणतांबेकर यांच्या निधनानंतर श्रद्धाजंली सभेतच लोकांनी ‘नानासाहेब पुणतांबेकर स्मृती न्यास डोंबिवली’ या संस्थेची स्थापना करण्याचा निश्चय केला. या संस्थेचे मालेगाव येथे कामही सुरू झाले. हळूहळू कामाचा पसारा वाढत गेला आणि आता हे काम डोंबिवलीपर्यंत येऊन पोहोचले आहे. ‘नानासाहेब पुणतांबेकर स्मृती न्यास डोंबिवली’ या संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊया.
 
 
 
गंगाधर म्हणजेच नानासाहेब पुणतांबेकर यांचा जन्म दि. २१ जून, १९२२ मध्ये मालेगाव तालुक्यातील खायदे या गावी झाला. त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या आईने त्यांचा सांभाळ केला. वडील डॉ. महादेव पुणतांबेकर आणि शिक्षिका असलेल्या आई राधाबाई यांच्या संस्कार मुशीतून गंगाधर हे घडत होते. कष्ट आणि सेवाव्रतीचे बाळकडू आई-वडिलांकडून लहानपणीच गंगाधर यांना मिळाले होते. आयुष्यात काही मोठे करायचे असेल, तर शिक्षण महत्त्वाचे आहे, असा विचार ते करीत होते. त्यामुळे त्यांनी बीएस्सी, एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. मालेगावमध्ये वकिली व्यवसायाला सुरुवात केली. वकिलीला एक पेशा न मानता समाजकार्य म्हणून स्वीकारले.
 
 
 
गरिबांना त्यांनी मदतीचा हात दिला. रा. स्व. संघाच्या विचारांची शिदोरी घेऊन १४ वर्षाच्या गंगाधर म्हणजेच नानासाहेब पुणतांबेकर यांनी समाजकार्याच्या यज्ञात आपल्या जीवनाची समिधा अर्पण केली होती. नानासाहेब हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. ते निष्णात वकील होतेच. झुंजार नेते ही होते. राजकारणात जनसंघापासून भाजपपर्यंत तसेच भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद यामध्ये ही त्यांचा मोठा सहभाग होता. ‘मालेगाव एज्युकेशन सोसायटी’ आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमात सहभागी होत असत. नाटकांमध्ये ही अभिनय करीत असत. सा.‘नागरिक’ही ते चालवित होते. विविध विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते. मालेगावात त्यांनी हिंदू जनजागृतीचे त्यांनी खूप मोठे काम केले.
 
 
 
अत्यंत खडतर परिस्थितीत १९७५ च्या आणीबाणीच्या काळात १९ महिने कारावास भोगून ते कधी ही हिंदू जनजागृती ध्येयापासून ते कधी ही विचलित झाले नाही. नानासाहेब यांचा समाजकार्याचा वसा त्यांच्या चारही मुलांनी ते पुढे चालू ठेवले आहे. नानासाहेबांचे सामाजिक काम मोठे असल्याने त्यांच्याप्रति नागरिकांच्या मनात आदर आणि प्रेम होता. त्या प्रेमापोटीचे त्यांच्या श्रद्धांजली सभेतच नागरिकांनी ‘नानासाहेब पुणतांबेकर स्मृती न्यास समिती’ची स्थापना करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार संस्थेचे काम सुरू झाले. नानासाहेब यांचे द्वितीय सुपुत्र डॉ. सुनील पुणतांबेकर हे सध्या डोंबिवलीत ‘नानासाहेब पुणतांबेकर स्मृती न्यास समिती’ चालवित आहे. नानासाहेब पुणतांबेकर ही नोंदणीकृत संस्था आहे. या संस्थेच्या अंतर्गत त्यांनी ‘अनीता रुग्णसाहाय्य केंद्रा’ची स्थापना केली. अनीता ही नानासाहेबांची चार मुलांसोबतची एकलुती एक मुलगी होती. पण ती चार वर्षांची असतानाच किरकोळ आजारी पडली होती. त्यातच तिचा मृत्यू झाला. अनीताच्या स्मृतिप्रीत्यर्थ या ‘अनीता रुग्णसाहाय्य केंद्रा’ची ५ फेब्रुवारी, २०१२ मध्ये सुरू करण्यात आले आहे.
 
 
 

sanstha  
 
 
 
 
‘अनिता रुग्ण साहाय्य केंद्रामध्ये रुग्णांना उपचारासाठी लागणारी सर्व वैद्यकीय उपकरणे पुरविली जातात. त्यामध्ये ‘एअरबेड’, ऑक्सिजन अशा विविध वस्तू याठिकाणी मिळतात. नफा कमविणे हा त्यामागे हेतू नसून केवळ सेवाभाव इतकाच हेतू आहे. हे काम केवळ डोंबिवलीपुरते मर्यादित राहिलेले नसून त्यांचे काम आता मुंबई, ठाण्यापर्यंत पोहोचलेले आहे. हे काम संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यांची मुर्हुतमेढ २ एप्रिल रोजी एक वेगळी गुढी उभारून करण्यात आली आहे. या केंद्रामार्फत नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरातील गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आतापर्यंत सात हजारांहून अधिक रुग्णांनी त्यांचा लाभ घेतला आहे.
 
 
 
मालेगावमध्ये ‘नानासाहेब पुणतांबेकर स्मृती न्यास समिती’च्या माध्यमातून ‘झुंजार पुरस्कार’ १९९८ पासून देण्यात येत आहे. नानासाहेबांच्या पहिल्या स्मृतिदिनाला सोलापूरचे वि. रा. पाटील यांना पुरस्कार दिला होता. त्यानंतर सुधीर फडके, बाबासाहेब पुरंदरे, नानासाहेब देशमुख, उज्ज्वल निकम यासारख्या नऊ लोकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. झुंजारपणे काम करणारी व्यक्ती न मिळाल्याने पुरस्कार प्रदान सोहळा सध्या बंदच आहे. मालेगावमध्ये सामाजिक उपक्रमांना सहलीच्या माध्यमातून भेटी देणे, कोकणातील टिळक लोकमान्य प्रकल्प, चित्रकुट प्रकल्पांकडे ही सहल काढण्यात आली होती. १९९७ ते २०१२ सहल, पुरस्कार असे विविध उपक्रम सुरू होते. मालेगावचे काम थांबल्यानंतर ते काम डोंबिवलीत डॉ. सुनील पुणतांबेकर यांनी सुरू केले. २००९ ला डोंबिवलीत ‘पुलोत्सव’ घेण्यात आला होता.
 
 
 
त्यामध्ये टिळकनगर ज्येष्ठ नागरिक संघ, ‘संस्कारभारती’ यांच्यासोबत न्यास ही संस्थादेखील सहभागी झाली होती. या उत्सवात तीन दिवसांत सात कार्यक्रम करण्यात आला होता. ‘पुलोत्सवा’च्या कार्यक्रमातून १ लाख, ११ हजार रुपये शिल्लक राहिले होते. तिन्ही संस्थांना एक लाख ११ हजार रुपये मिळाले. त्यातूनच पुणतांबेकर यांनी ‘अनीता रुग्णसाहाय्य केंद्रा’ची स्थापना केली. संस्थेने २०११ मध्ये नीला सत्यनारायणाच्या कवितावर ही कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमादरम्यानाच त्यांनी रुग्णाला मदत करण्याचा मानस आहे, असा सूतोवाच केला होता. २०१२ मध्ये पहिल्या रुग्णाला ‘ऑक्सिजन’ देण्यात आला. वस्तू पुन्हा द्यावी, यासाठी ‘डिपॉझिट’ घेतले जाते. वस्तू वापरून पुन्हा दिली की, ‘डिपॉझिट’ची रक्कम पुन्हा दिली जाते. संस्थेकडे सुरुवातीला अपुरी जागा होती. ‘विवेकानंद सोसायटी’मध्ये बोरसे यांनी संस्थेला मोफत जागा वापरण्यास दिली.
 
 
 
चित्तरंजन कुलकर्णी यांच्या बंगल्याच्या आवारात पुढे सोसायटीत जागा होती ती संस्थेला वापरण्यास दिली. अतुल आणि आनंद पुराणिक यांनी सर्वेश सभागृहाजवळील पुराणिक वाड्यातील एक खोली वापरण्यास दिली होती. प्रकाश पाटील यांनी एक जागा भाड्यांनी पुस्तक ठेवण्यास घेतली होती. त्यातील शिल्लक जागा संस्थेला दिली. संस्थेने प्रत्येक जागेत दीड वर्षे कामकाज केले. सहा वर्षांनंतर संस्थेनी ‘सीकेपी’ सभागृहाजवळ ३०० स्के.फूटची जागा घेतली आहे. ही जागा संस्थेला सध्या अपुरी पडत आहे. नवीन जागेच्या शोधात संस्था आहे. रुग्णलयात रुग्णांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी रुग्णमित्र काम करतात. नातेवाईकांना काही वेळासाठी घरी जायचे असेल, त्यावेळेत रुग्णमित्र रुग्णांकडे थांबतात. भविष्यात रुग्णाला गरज भासल्यास त्यांना ते तास परत केले जातात. ‘फिजोओथेरपिस्ट’ लागतात. सरकारी योजनांची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना दिली जाते. नातेवाईक खचलेले असतात. त्यांना मानसिक आधार देण्याचे काम येथे केले जाते. कोणतेही वेतन न घेता रुग्णमित्र काम करतात. १५ ते २० रुग्णमित्र आहेत.
 
 
 
संस्थेने कडोंमपाकडे ‘सिटी फॉरेस्ट’ योजनेचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावाअंतर्गत महापालिकेने दहा हजार स्के.फूट जागा दिल्यास व पाणी दिल्यास त्याला संरक्षक भिंत करायची. त्या जागेत जंगल तयार करायचे. ऑक्सिजन देणारी झाडे लावून त्याठिकाणी जंगल तयार करण्याचा मानस आहे. सध्या ‘नानासाहेब पुणतांबेकर स्मृती संस्थे’च्या अध्यक्षपदी डॉ. सुनील पुणतांबेकर आहे. कार्यवाह अशोक धामणकर, कोषाध्यक्ष बाळकृष्ण काळे असून नेहा आणि श्वेता पुणतांबेकर यांच्यासोबत डॉ. शामकांत घोटीकर डॉ. अनिल चौधरी, डॉ. दिलीप कोपरडे, प्रमोद ढगे आणि अजय पुणतांबेकर ११ विश्वस्त आहेत. हे सर्वजण या संस्थेच्या विश्वस्त म्हणून काम पाहत आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@