मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचे आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्याला मंजूर झालेला जामीन रद्द करण्याबाबत मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला नोटीस बजावली आहे. राणा दाम्पत्याने जामीन मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक भाषा वापरली तसेच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढवावी मी त्यांच्या विरोधात लढेन अशी आव्हान देणारी भाषा वापरली असे आरोप सरकार कडून करण्यात आले आहेत.
राणा दाम्पत्याने जामीन मंजूर होते वाफेला घातलेल्या अटीशर्तींचे उल्लंघन केले आहे त्यामुळे त्यांना मंजूर झालेला जामीन रद्द करण्यात यावा असे सरकारकडून कोर्टात सादर करण्यात आलेल्या अर्जात म्हटले आहे. राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करताना या खटल्यासंबंधात उघडपणे बोलण्यास मनाई केली होती पण याच अटींचे त्यांच्याकडून उल्लंघन झाल्याने मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला कारणे दाखवा नोटिस बजावली आहे.