नागपूर : शनिवार ( ७ मे ) रोजी देवेंद्र फडणवीसांनी लीलावती हॉस्पिटल मध्ये नवनीत राणांना भेट दिली. जेलमधून सुटल्यावर नवनीत राणा मुंबईच्या लीलावती हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी गेल्या. तेव्हा अनेक नेतेमंडळी त्यांना भेटण्यासाठी तेथे गेली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटून त्यांची चौकशी केली.
ज्याप्रमाणे एखाद्या आरोपीला वागणूक मिळते तशी वागणूक नवनीत राणांना मिळाली. सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. नवनीत राणांना झालेला त्रास हा खूपच गंभीर आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर बरे व्हावे. असे फडणवीस माध्यमांसमोर म्हणाले.