"मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पस मध्ये राष्ट्रीय एकात्मता शिबिर संपन्न"

एसएसटी महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटचा सहभाग

    31-May-2022
Total Views | 69

titwala
 
 
 
 
 
टिटवाळा : राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे समारोप समारंभ मोठ्या उत्सहात संपन्न झाला. मुंबई विद्यापीठाच्या एनएनएस विभागाने याचे यजमान पद स्वीकारले होते. या शिबिरा मध्ये एकूण २८ विद्यापीठांचे प्रतिनिधित्व करणारे १२ राज्यातील २२० स्वयंसेवक सहभागी सहभागी झाले होते.
 
 
 
दिनांक २२ मे ते २८ मे या ७ दिवसात टॅलेंट शो, स्किट्स, नृत्य, गाणी इ. विविध प्रकारचे सांस्कृतिक देवाणघेवाणचे उपक्रम संपन्न झाले. आपल्या देशाची समृद्ध संस्कृती आणि वारसा जतन करणे हे या शिबिराचे उद्दिष्ट होते. यां शिबिरामध्ये एसएसटी महाविद्यालयाच्या निशांत मेश्राम या एनएनएस स्वयंसेवकाची ही निवड झाली होती. त्याने केलेल्या कामगिरीबद्दल त्याला सन्मान चिन्ह देउन गौरविण्यात आले. या सोबतच एसएसटी महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि एनएसएसचे ठाणे जिल्हा समनवयक प्रा जीवन विचारे आणि एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा मयूर माथूर यांची ही आयोजन समिती मध्ये निवड झाली होती. त्यांनी यात उत्कृष्ट कामगिरी पार पाडली. त्याबद्दल त्यांचे विद्यापीठाकडून अभिनंदन केले.
 
 
 
या शिबिराच्या समारोप प्रसंगी डॉ. शरद बोरुडे संचालक एम्पनल्ड ट्रेँनिंग इन्स्टिट्यूट, अहमदनगर, डी. कार्तिकेयन क्षेत्रिय निर्देशक, एनएसएस महाराष्ट्र आणि गोवा, सुधीर पुराणिक कुलसचिव आणि संचालक राष्ट्रीय सेवा योजना, मुंबई विद्यापीठ, डॉ.सुनील पाटील संचालक स्टुडंटस डेव्हलपमेंट सेल, मुंबई विद्यापीठ रमेश देवकर कार्यक्रम अधिकारी एनएसएस सेल, मुंबई विद्यापीठ, सुशील शिंदे, ओएसडी, एनएसएस सेल मुंबई विद्यापीठ या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या शिबरामध्ये एसएसटी महाविद्यालयाच्या एनएसएस स्वयंसेवकांनी रांगोळीचे आणि लेझीम नृत्याचे दिमाखदार सादरीकरण करून सर्वांना मंत्र मुग्ध केले होते. त्याचे आयोजकांनी कौतुक केले.
 
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121