मुंबई : मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात ४ मे पासून आंदोलन करण्यावर मनसे ठाम असून, हे आंदोलन कसे करावे या बाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्याना सूचना दिल्या आहेत. कुठल्याही प्रकारे कायद्याचे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होणार नाही याची आपल्याकडून दक्षता घेतली गेली पाहिजे अश्या सूचना राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत.
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना ५ सूचना केल्या आहेत.
- ज्या ठिकाणी अनधिकृत भोंग्यांवरून केली जात आहे अश्याच ठिकाणी भोंग्यांवरून हनुमान चालीसा लावा.
- मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याआधी रीतसर परवानगी घ्या.
- अनधिकृत अजान सुरु झाल्यास पोलिसांकडे तक्रार करा.
- अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करा.
- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होत असेल तर आंदोलन करा.
अशा सूचना देऊन आपले आंदोलन कायद्याच्या चौकटीतच राहून करा असा आदेश राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. औरंगाबाद येथे झालेल्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन झाल्याच्या आरोपावरून राज ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाले आहेत.याच पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.