लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी ठार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2022   
Total Views |

AB
 
 
 
नवी दिल्ली: काश्मिरी अभिनेत्री अमरीना भटची हत्या करणाऱ्या एलईटीच्या दोन दहशतवाद्यांनी चकमकीत ठार मारण्यात आले आहे. आज दि. 27 रोजी जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी काश्मिरी अभिनेत्री आणि गायिकेची हत्या करणाऱ्या लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या दोन दहशतवाद्यांना गोळ्या घालून ठार केले. या दाध्शात्वाद्यानी बुधवारी अम्रीना भट्ट यांची हत्या केली होती.
इस्लामचा अपमान केल्याबद्दल इस्लामवाद्यांनी काश्मिरी अभिनेत्री अमरीना भटला शिवीगाळ केली गेली. मुस्लीम समाजातील लोकांकडून तिला तिच्या कामामुळे टार्गेट केले जात होते. आणि तिच्या हत्येनंतर अनेक कट्टरपंथी इस्लामी सोशल मीडियावर आनंदोत्सव साजरा करताना दिसले. 'एलईटी' कमांडर लतीफच्या सूचनेनुसार त्यांनी टीव्ही कलाकाराची हत्या केली होती, अशी माहिती काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी दिली. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे दि. २६ मे रोजी रात्री दोन्ही दहशतवादी सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एलईटीचा ठार झालेला दहशतवादी शाहिद मुश्ताक भट्ट हा बडगाममधील हफ्रू चादुरा येथील रहिवासी होता. दुसरा दहशतवादी फरहान हबीब हा पुलवामा येथील हाक्रीपोरा येथील रहिवासी होता. हे दोघे नुकतेच एलईटीमध्ये सामील झाले होते.
@@AUTHORINFO_V1@@