नवी दिल्ली: काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिकला दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणात दोषी असून, दिल्लीतील न्यायालयात बुधवारी शिक्षा होऊ शकते. मलिकला जन्मठेपेची किव्वा मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते. विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी मलिकला यूएपीए कायद्या अंतर्गत आरोपांवर दोषी ठरवले. पतियाला हाऊसच्या विशेष न्यायाधीशांनी दंडाची रक्कम निश्चित करता येईल या कारणाने एनआयए अधिकाऱ्यांना यासिन मलिकच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करण्याचे निर्देश दिले होते.
''मला आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना सामोरे जायचे नाही'', असे मलिक यांनी न्यायालयाला यापूर्वी सांगितले होते. मलिक सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे. २०१७ च्या हिंसाचाराशी संबंधित प्रकरणात कलम १२०-ब गुन्हेगारी कट, कलम १२४-अ देशद्रोहचे आरोप मलिकवर लावण्यात आले.
दहशतवादी बुरहानी चकमकीत ठार झाल्यानंतर २०१६-२०१७ मध्ये काश्मीर खोऱ्यात दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली. यानंतर तपास यंत्रणा एनआयएने यासीन मलिक आणि अन्य फुटीरतावाद्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून, कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान मलिकने सर्व आरोपांची कबुली दिली.