ज्ञानवापी ढाचाची पुढील सुनावणी २६ मेला

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

    24-May-2022
Total Views | 40

gyanvapi 3
 
 
 
 
 
वाराणसी : ज्ञानवापी ढाचाचे सर्वेक्षण सुरु असतानाच शिवलिंग सापडल्याची घटना समोर आली होती. त्याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी ढाच्यावर सुनावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तूर्तास ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, पुढील सुनावणी २६ मेला करण्यात येणार आहे.
 
 
 
ज्ञानवापी ढाचा संदर्भात सोमवार दि. २३ मे रोजी हिंदू आणि मुस्लिम या दोन पक्षांमध्ये युक्तिवाद पार पडला. सोमवारी २३ मेला दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला होता. या युक्तिवादावर पुढील सुनावणी २६ मे रोजी घेण्यात येणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
 
 
 
ज्ञानवापी मशीद ढाच्याची सुनावणी ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने वाराणसी जिल्हा न्यायालयात सुरु होती. या सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्या हिंदू पक्षाने सर्वेक्षणात आढळलेले साक्षी पुरावे तपासावेत, व त्या नंतर पुढील सुनावणी करावी अशी विनंती केली. तर मुस्लिम पक्षाने या संपूर्ण खटल्याच्या सुनावणीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. २६ मे रोजी होणाऱ्या सुनावणीवर काय निर्णय घेण्यात येणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत चोख प्रत्युत्तर देण्यास बुधवार, दि. ७ मे रोजी सुरुवात केली. त्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ९ ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. अशातच आता सीमावर्तीभागात भारतीय लष्कराच्या जोरदार हालचाली होताना दिसतायत. पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे परंतु भारताची अत्याधुनिक यंत्रणा पाकिस्तानचा प्रयत्न अयशस्वी करत आहेत. अशातच भारत-पाकिस्तान युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. पाकिस्तानला तात्काळ मागे हटण्याचे आणि भारतासोबतचा तणाव त्वरित कमी करण्याचे आदेश अमेरिक..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121