जपानच्या पंतप्रधानांकडून भारताचा गुणगौरव..

- भारताच्या लसीकरण कार्याचे कौतुक

    24-May-2022
Total Views | 51
 
 
vaccine
 
 
 
टोकियो : जपानमधील शिखर परिषदेत अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाने कोरोना महामारीच्या काळात केलेल्या लसीकरण कार्याचे कौतुक केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या कार्याचे कौतुक केले. बायडन यांनी महामारीचा सामना करताना चीन आणि भारताची तुलना करत भारताची मोठी लोकसंख्या असूनही भारताने लोकशाही मार्गाने कोरोनावर नियंत्रण केल्याचे ते म्हणाले.
 
भारताचे कौतुक करताना जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा म्हणाले की, "क्वाड व्हॅक्सिन इनिशिएटिव्ह अंतर्गत भारतात बनवलेली लस नुकतीच थायलंड आणि कंबोडियाला पाठवण्यात आली आहे." तसेच "भारताच्या लस पुरवठ्याचा अनेक देशांना फायदा होत आहे." असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज म्हणाले.
 
शिखर परिषदेनंतर पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांची द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी बायडन यांनी कोरोनाच्या काळात भारताच्या कामाचे कौतुक केले. त्याचबरोबर भारत आणि अमेरिकेची भागीदारी ही खर्‍या अर्थाने विश्वासाची भागीदारी असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
भारतात प्रत्यार्पणाच्या चर्चा, तहव्वूर राणा नेमका आहे कोण? २६/११ च्या हल्ल्यात त्याची काय भूमिका होती? सविस्तर वाचा...

भारतात प्रत्यार्पणाच्या चर्चा, तहव्वूर राणा नेमका आहे कोण? २६/११ च्या हल्ल्यात त्याची काय भूमिका होती? सविस्तर वाचा...

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शेकडो निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणा याला अमेरिकन पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर भारताने त्याचे प्रत्यार्पण व्हावे यासाठी अनेक प्रयत्न केले होते. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला, त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या प्रत्यार्पणास हिरवा कंदिल दाखवला होता. मात्र तहव्वूर राणाकडून प्रत्यार्पण टाळण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात होते. त्याने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121