मुंबई महापालिका प्रशासन राजकारण करण्यातच मश्गुल!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2022   
Total Views |


amit satam
 
 
 
 
  
मुंबई : मागील दोन वर्षांपूर्वी मुंबईत ११२ टक्के, तर मागील वर्षी १०४ टक्के नालेसफाई झाल्याचे दावे मुंबई महापालिका प्रशासनाने केले होते, मग यावर्षी ते प्रमाण ७८ टक्क्यांवर का थांबले? आपल्या राजकीय विरोधक आणि प्रतिस्पर्ध्यांच्या घरावर किंवा कार्यालयांवर नोटीसा लावण्यात आणि त्यांना ‘टार्गेट’ करण्यात सध्याचे मुंबई महापालिका प्रशासन व्यस्त आहे. थोडक्यात सांगायचे, तर इतर महत्त्वाची कामे करण्यापेक्षा राजकारण करण्यातच मुंबई महापालिका प्रशासन हे मश्गुल असल्याची सध्याची स्थिती आहे, अशी टीका मुंबई भाजपचे नेते आणि आमदार अमित साटम यांनी केली आहे. मुंबईतील मान्सूनपूर्वची कामे आणि नालेसफाईची स्थिती यावर बोलताना साटम यांनी महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका करत यावर्षीही मुंबईची तुंबई होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, असा इशाराही दिला आहे. आ. अमित साटम आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या प्रतिनिधींनी जुहूच्या ‘इर्ला पम्पिंग स्टेशन’ची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी विशेष संवाद साधला.
 
 
 
नालेसफाईची गती थंडावली
 
नालेसफाईच्या कामाबाबत आ. अमित साटम म्हणाले की, ”मुंबई महापालिका प्रशासन आणि उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका क्षेत्रात ७८ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला आहे. मात्र, मागील दोन वर्षांमध्ये पालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नालेसफाईच्या आकड्यांमध्ये आणि यावर्षीच्या आकड्यामध्ये मोठी तफावत असून यावर्षी झालेली नालेसफाई कमी आहे. त्यामुळे महापालिकेच्या नालेसफाईची गती का थंडावली? याचे उत्तर प्रशासनाने देणे आवश्यक आहे. नालेसफाईनंतर नाल्यांमधून काढण्यात आलेला गाळ रस्त्याच्या कडेलाच टाकण्यात येत असून जर तो काही काळ तसाच राहिला तर पावसाच्या पाण्याने पुन्हा त्याच नाल्यात जाऊन जमा होईल. त्यामुळे नालेसफाईला काहीही अर्थ उरणार नाही. सध्या मुंबई महापालिकेतील प्रशासन दिशाहीनतेने काम करत असून राजकारण करण्यात मश्गुल असलेले प्रशासन मुंबईत कार्यरत आहे, असा माझा आरोप आहे.”
 
 
 
‘इर्ला पम्पिंग स्टेशन’ची पाहणी
 
जुहूमधील इर्ला पम्पिंग स्टेशनची पाहणी केल्यानंतर आ. अमित साटम म्हणाले की, “पम्पिंग स्टेशनच्या कामाचे कार्यादेश २०१९ साली नऊ महिन्यांच्या कालावधीत काम पूर्ण करण्याच्या अटीवर देण्यात आले होते. आता २०२२ उजाडले, तरी हे काम झालेले नाही, ते रखडलेलेच आहे. त्यासोबतच अंधेरीतील एका पुलाचीही पाहणी केल्यानंतर १८ महिन्यांच्या कालावधीत काम पूर्ण करण्याच्या अटीवर मंजूर करण्यात आलेले कामच १८ महिन्यांच्या विलंबाने सुरु झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या दिरंगाईने कामे पूर्ण करणारे महापालिकेचे प्रशासन हे केवळ अकार्यक्षमच नाही, तर भ्रष्टदेखील आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रशासनातून मुंबईकर आता स्वतःची सुटका स्वतःच करून घेतल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित.”
 
 
 
प्रत्येक जण वसुलीत व्यस्त!
 
“काही दिवसांवर असलेल्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मान्सूनपूर्वची कामे जलदगतीने होणे आवश्यक आहे. मात्र, ती होताना दिसत नाहीत. नालेसफाईचा दावा केला जात असला, तरी गाळ अद्याप रस्त्यांवर तसाच आहे. वृक्षतोडीच्या संदर्भातदेखील झाडांच्या कापलेल्या फांद्या प्रामुख्याने रस्त्यावर पडलेल्या दिसून येतात. त्यासोबतच शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्नदेखील प्रलंबितच आहे. त्यावरदेखील पालिका काही करायला तयार नाही. त्यामुळे सध्याच्या प्रशासनात कुणालाही कुठल्याही महत्त्वाच्या गोष्टींचा पायापोच राहिला नसून प्रत्येक जण वसुलीत व्यस्त आहे,” असेही साटम यांनी म्हटले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@