जमीन द्या, रेल्वेत नोकरी घ्या! : रेल्वेमंत्री असताना लालूंचा वेगळाच प्रताप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2022   
Total Views |
Lalu 
 
 
 
पटना: भ्रष्टाचार प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो 'सीबीआय'ने शुक्रवारी दि. २० मे रोजी १७ ठिकाणांवर छापे टाकले. दिल्लीहून बिहारच्या विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. हे छापे जमीन घेऊन रेल्वेत नोकरी देण्याशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील 'यूपीए' सरकारमध्ये लालू यादव रेल्वेमंत्री होते.
 

 
सीबीआयच्या पथकाने लालू यादव, त्यांची पत्नी माजी मुख्यमंत्री राबरी आणि मुलगी मीसा भारती यांच्या निवासस्थानासह बिहार आणि दिल्लीतील अनेक ठिकाणी एकाचवेळी कारवाई केली आहे. यादरम्यान सीबीआयचे एक पथक राबडी देवी यांच्या १०, सर्क्युलर रोडच्या शासकीय निवासस्थानीही पोहोचले. लालू प्रसाद रेल्वेमंत्री असताना नोकरीच्या बदल्यात काही लोकांकडून जमिनी घेण्यात आल्या. राबरी यांच्या निवासस्थानी सीबीआयचे १० लोकांचे पथक पोहोचले आहे.



यामध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे. या सर्वांची राबरी यांच्या निवासस्थानी तपासणी सुरू आहे. या काळात कोणालाही घरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. राबडी देवीच्या पाटण्यातील निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त आहे. सीबीआयची टीम लालू यादव, त्यांची मुलगी मिसा आणि इतर नातेवाईकांची चौकशी करत आहे. चारा घोटाळ्यात राजदच्या नेत्याला जामीन मिळाल्यानंतर काही आठवड्यांनंतरच हे प्रकरण समोर आले आहे. यावर्षी एप्रिल मध्ये झारखंड उच्च न्यायालयाने लालू यादव यांना दहा लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. लालूंच्या वतीने उच्च न्यायालयात विशेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी जामीन याचिका दाखल करण्यात आली होती.
@@AUTHORINFO_V1@@