"महाआरती रद्द करा, ईदचा सण आनंदात साजरा होऊ द्या."

राज ठाकरेंचे मनसे कार्यकर्त्यांना आवाहन

    02-May-2022
Total Views | 74

raj
 
 
 
मुंबई : " उद्या ईदचा सण आहे, मुस्लिम समाजाचा हा सण आनंदात साजरा व्हावा. आपले आधी ठरल्याप्रमाणे अक्षय्यतृतीया सणानिमित्त कुठेही आरती करू नका. आपला कुठल्याही धर्मच्या सणांना विरोध नाही." अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना ट्विटरवर आवाहन केले आहे. "आपला भोंग्यांचा मुद्दा हा सामाजिक आहे, धार्मिक नाही. आपली या पुढची वाटचाल कशी असेल या बद्दल उद्या मार्गदर्शन करेन.", असेही राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात राज ठाकरे यांनी आवाज उठवल्यावर राज्यभर या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. रमजान ईद बरोबर येणाऱ्या अक्षय्य तृतीय या सणाच्या निमित्ताने ठिकठिकाणी महाआरतींचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबादच्या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, आपण कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही असे सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी जनतेला ट्विटरद्वारे आवाहन केले आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121