राज्यात आता ‘वर्क फ्रॉम जेल’

    02-May-2022
Total Views | 80
nm
मुंबई: बुधवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील एका निर्णयाच्या पोस्टरवर तुरुंगात अटकेत असलेल्या नवाब मलिक यांचे नाव आणि छायाचित्र झळकले होते. त्यावरही देवेंद्र फडणवीसांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, इतक्या दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ माहिती होते. पण, या सरकारच्या काळात बिनखात्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या कृपेने ‘वर्क फ्रॉम जेल’ पाहायला मिळाले. दरम्यान, शिवसेनेने पेट्रोल-डिझेलच्या किमती व करावरुन केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली होती. त्यावरही देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, “इंग्रजी दारूवरचा कर उद्धव ठाकरेंच्या सरकारने कमी केला. पण, पेट्रोल-डिझेलवरचा कर मात्र उद्धव ठाकरेंच्या सरकारने कमी केला नाही. हे सरकार बेवड्यांसाठी काम करते. तसेच न्यायालयाने आदेश दिलेला असतानाही वेश्यांच्या अनुदानात घोटाळा करण्याचे महापाप या सरकारने केले आहे,” असे सांगत देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील घोटाळ्यांची यादीच वाचून दाखवली.
इफ्तार पार्टी झोडल्याने बेरोजगारीचे प्रश्न सुटणार नाहीत
देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही टोला लगावला. फडणवीस म्हणाले की, “शरद पवार म्हणतात हनुमान चालीसा म्हटल्याने काय बेरोजगारांचे प्रश्न सुटणार आहेत का? पण, इफ्तार पार्टी झोडल्यानेही बेरोजगारांचे प्रश्न सुटणार नाहीत,” असे म्हणत फडणवीसांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. राज्यात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात कमी झाली असून आमच्या सरकारमध्ये महाराष्ट्र गुंतवणुकीत दुसर्‍या क्रमांकावर होता, आता तो मागे गेल्याचेही फडणवीसांनी यावेळी सांगितले. महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचारात पुढे असून कंत्राट देण्याच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार सुरू असल्याचेही ते म्हणाले.
अग्रलेख
जरुर वाचा
अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121