पकडलेल्या आरोपींचे नाव गणेश धर्मा बरोरा आणि जितेंद्र किसन बरोरा असे आहे. हे दोघे पेंढरघोळ गावचे रहिवासी आहेत. सदर आरोपींची अधिक चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना दि २९ एप्रिल रोजी न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने गुन्ह्याच्या अधिक तपासाकरिता आरोपींना एक दिवासाची वन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार मेंगाळपाडा येथील आरोपी जयराम देऊ भगत याचे घरी धाड टाकण्यात आली. या घरातून रानडुक्कराचे उकळलेले मांस आणि पाच वागुर मिळून आले. मुददेमालासह संशयित इसम जयराम देऊ भगत याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपवनसंरक्षक शहापूर सचिन रेपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. वनसरंक्षक अमोल जाधव व वनपरिक्षेत्र अधिकारी शहापूर प्रकाश चौधरी करत आहेत. कारवाईमध्ये वनपाल वासिंद सुनिल भोर्डिवले, वनपाल आटगांव बागुल, वनरक्षक मंगेश शिंदे सेमेल भोसले, प्रविण विशे, जयसेन गांवडे, चंद्रप्रकाश मौर्या, संदिप जाधव, दादाभाई पाटील, इंदुमती बांगर, रूपाली सोनवने, कविता बेणके, वनमजुर मधकुर घरत वाहनचालक भरत निचिते राजेश गोळे यांचे सहाय्य मिळाले.