...म्हणून २१ ऐवजी २२ मे ला पुण्यात होणार राज ठाकरेंची सभा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2022   
Total Views |
Raj

 
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातली सभा २१ मे रोजी मुठा नदी पात्रातील मैदानात होणार होती. मात्र त्यापूर्वीच राज ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे दिसून आले. यामुळे त्यांची सभा रद्द झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पावसाची शक्यता असल्याने ही सभा रद्द करण्यात आली असून तिच सभा आता २२ मे रोजी पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंचमध्ये होणार असल्याचे गुरुवार, दि. १९ मे रोजी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
 
 
 
"नदीपात्रातील मैदानात सभा होणार असल्याचं निश्चित झालं होतं. मात्र प्रकृती ठीक नसल्याने राज ठाकरे बुधवारी (१८ मे) मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पावसाची शक्यता असल्याने हजारो लोकांना त्रास होऊ नये याखातर २१ मे ऐवजी २२ मे रोजी सकाळी ही सभा घेण्याचा निर्णय राज ठाकरेंकडून घेण्यात आला आहे.", असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@