नवी दिल्ली: काशीतील ज्ञानवापी ढाच्याचा वाद पेटलेला असतानाच आता मथुरेतील मशिदीचा वादही ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत. मथुरेतील कृष्णजन्मभूमीच्या जागी मशीद उभारली गेली आहे याविरोधातलं याचिका न्यायालयात दाखल केली गेली आहे. तब्बल ११ याचिका विविध न्यायालयात दाखल केली इल्या आहेत. हिंदू संघटनांकडून या जागी पूजेअर्चेसाठी परवानगी मागणारी याचिका दाखल केली गेली आहे.
१६७० मध्ये काशीमधील काशी विश्वेश्वर मंदिराच्या पाठोपाठ औरंगजेब बादशहाने मथुरेतील केशवदास मंदिराचाही विध्वंस केला होता. याच मंदिराच्या जागी सध्याचा शाही ईदगाह बांधण्यात आला आहे असा हिंदू संघटनांचा दावा आहे. रामजन्मभूमी आंदोलनापासूनच हिंदू संघटना याही जागेचा ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात होत्या. रामजन्मभूमीच्या ऐतिहासिक निकालानंतर आता पहिले काशीचा ज्ञानवापी ढाचा आणि आता मथुरेतील शाही ईदगाह यांचेही वाद ऐरणीवर आले आहेत.