महाराष्ट्रात 'आयसीस'च्या दहशतवाद्याला सोडले!
@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@
Total Views |
मुंबई(प्रतिनिधी): महाराष्ट्रातील औरंगाबादमधील राज्याच्या बाल न्याय मंडळाने 'आयसीस'या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका दहशतवाद्याची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने आपल्या भागातील शाळकरी मुलांना शिकवण्याचे आदेश दिले आहेत.
अहवालानुसार, दहशतवादी प्रकरणात दोषी ठरलेल्या अल्पवयीन मुलाच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. तीन सदस्यीय बाल न्याय मंडळाच्या नेतृत्वाखालील प्रधान दंडाधिकारी यांनी हे आदेश दिले आहेत. या किशोरवयीन आरोपीने निरीक्षण गृहात दि. २३ जानेवारी २०१९ पासून तीन वर्षे घालवली आहेत. दि. ११ मे रोजी बाल न्याय मंडळाने आपल्या निर्णयात 'चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ द लॉ ' अंतर्गत दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या गुन्हेगारांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आरोपीच्य चांगल्या वर्तनाच्या आधारावर सोडण्यात आले आहे. त्याला पोलीस ठाण्यातील प्रोबेशन ऑफिसरच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. पुढील सहा महिने महिन्यातून दोनदा वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांची सेवा करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच बरोबर सामाजिक कार्यात हातभार लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांना त्यांच्या परिसरातील इयत्ता सातवी आणि नव्वीच्या मुलांना गणित आणि इंग्रजी शिकवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र एटीएसने २०१८ मध्ये अटक
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दोषीला त्याच्या इतर सदस्यांसह २७ डिसेंबर २०१८ रोजी अटक केली. त्यावेळी ते 17 वर्षांचे होते. प्रतिबंधित इस्लामिक दहशतवादी संघटना ISIS च्या संघटित मॉड्यूलचा भाग असल्याने त्याला अटक करण्यात आली होती. औरंगाबाद आणि मुंबईत दहशतवादी घटना घडवण्यासाठी 'उम्मत-ए-मोहम्मदिया' नावाची संघटना स्थापन करणाऱ्या दहशतवाद्यांना महाराष्ट्र एटीएसने अटक केल्याचे यावेळी सांगण्यात आले. ऑगस्ट २०१८ मध्ये,राज्य दहशतवादी विरोधी पथकाच्या औरंगाबाद युनिटने एका अल्पवयीन संशयितासह नऊ जणांना ताब्यात घेतले होते. या सगळ्यांवर आयसीसचा प्रभाव असल्याचा आणि दहशतवादी हल्ल्याची योजना आखल्याचा संशय होता. नऊआरोपी दहशतवादी संघटना इसिसच्या विचारसरणीने प्रेरित असल्याचा आरोप एटीएसने केला होता. त्यांनी काही विषारी पदार्थ आणि स्फोटकांचा वापर करून मुंबई, औरंगाबाद आणि इतर ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचला होता.
@@AUTHORINFO_V1@@