भांडूप पंपिंग जवळ फुलली फुलपाखरांची बाग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2022   
Total Views |
bps
 
मुंबई (प्रतिनिधी): ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचा भाग असलेल्या भांडूप पम्पिंग स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ फुलपाखरांची बाग साकारण्यात आली आहे. कांदळवन कक्षाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या बागेत, फुलपाखरांच्या जीवनचक्रासाठी उपयुक्त झाडे लावण्यात आली आहेत.
 
फुलपाखरे परीसंस्थेच्या आरोग्याचे सूचक आहेत. ते परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावतात. कांदळवन क्षेत्रातील जैवविविधता वाढवण्यासाठी 'वनशक्ती'ने भांडुप पंपिंग स्टेशनवर जंगलाच्या प्रवेशद्वाराजवळ हे फुलपाखरू उद्यान तयार केले आहे. हे उद्यान स्थानिक लोकांच्या मदतीने बनवण्यात आले आहे.पर्यटकांना फुलपाखरे आणि त्यांचे महत्त्व समजण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. भांडुप पंपिंग स्टेशनला भेट देणाऱ्यांसाठी ही बाग एक अतिरिक्त आकर्षण आहे. या कार्यक्रमात मॅन्ग्रोव्ह सेलचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी, विभागीय वन अधिकारी आदर्श रेड्डी, वनपरिक्षेत्र अधिकारी वासू कोकरे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
 
“मॅन्ग्रोव्ह सेल पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचे नियोजन करत आहे. भविष्यात 'बटरफ्लाय गार्डन मॉडेल' इतर ठिकाणीही तयार केले जातील यामुळे अभयारण्याचे सौंदर्य मूल्य आणि पर्यटन क्षमता सुधारेल. -स्टालिन दयानंद, अध्यक्ष, वनशक्ती”
@@AUTHORINFO_V1@@