वाराणसी : काशी विश्वनाथाच्या देवळाला लागून असलेल्या वादग्रस्त ज्ञानवापी ढाच्याचा सर्वेक्षणात बाजूला असलेल्या विहिरीत शिवलिंग सापडले. याच सापडलेल्या शिवलिंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. यात हे स्पष्टपणे दिसत आहे की हे विहिरीत शिवलिंग आहे. हेच ते उद्धवस्त केल्या गेलेल्या देवळातील शिवलिंग असा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात येतो आहे. सध्या या परिसराची साफसफाई सुरु असून परिसराला पोलिसांचा वेढा आहे.
या ढाच्याचा सर्वेक्षणाला सुरुवातीपासूनच आक्षेप घेणाऱ्या मुस्लिम पक्षकारांनी सापडले आहे ते शिवलिंग नसून कारंज्याच्या भाग आहे असा दावा केला आहे. हा परिसर संरक्षित करण्यात आला असून तिथे मुसलमान समुदायास वजू करण्यासही बंदी घातली गेली आहे. ढाच्याचा सर्वेक्षणाच्या अखेरच्या दिवशी या ढच्याच्याबाजूला असलेल्या विहिरीत शिवलिंग आढळून आल्याचा दावा हिंदू पक्षकारांकडून केला गेला. अलाहाबाद दिवाणी न्यायालयाने ही जागा संरक्षित करण्याची हिंदू समुदायाची मागणी मान्य करून तिथे कोणासही प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.